• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 5, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जिल्हा नियोजन समितीच्या टक्केवारीचे ‘वासे’ कोणी फिरवले ?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 4, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
779
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

पालकमंत्र्यांच्या एका ओएसडीने मुंबईतून केले कामांचे वाटप

टक्केवारी घेतल्याची चर्चा, स्थगिती दिल्याने गुत्तेदार, कार्यकर्ते अडचणीत

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर २६८ कोटींच्या कामांना स्थगिती दिल्याची बाब समोर आल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. एका सत्ताधारी आमदारावर अंगुलीनिर्देश असल्याने विरोधी आमदारांनी टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान,मंजूरी दिलेल्या या कामांचा सर्वाधिक वाटा अर्थातच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना मिळाला होता. खात्रीलायक माहितीनुसार पालकमंत्री सरनाईक यांच्या एका तथाकथ‍ित ओएसडीने मुंबईत बसूनच पालकमंत्र्यांच्या हिश्श्याच्या कामांचे वाटप संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांना हाताशी धरून केले आहे. त्यामुळे वाटप केलेल्या कामांना स्थगिती दिल्याने गुत्तेदार कार्यकर्ते अडचणीत सापडले आहेत.

एकीकडे जिल्ह्याचा विकास रखडलेला असताना दरवर्षीच्या हक्काच्या नियोजन समितीच्या निधीवरून अडथळ्यांची शर्यत सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास कसा होणार आणि कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या ४०८ कोटींपैकी उर्वरित २६८ कोटींच्या कामांचे वाटप मतदारसंघनिहाय ठरवण्यात आले होते. त्यापैकी १५ टक्के निधी सत्ताधारी आमदारांना तर १० टक्के निधी विरोधी आमदार तसेच खासदारांसाठी देण्यात आला होता.

त्यानुसार चार आमदार, आणि खासदारांचा निधी वगळून साधारण ११० कोटींचा निधी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वत:कडे ठेवला होता. मात्र, यामध्ये सत्ता असूनही विरोधातील आमदारांचा सर्वाधिक फायदा होत असल्याची बाब एका आमदारासह सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या न‍िदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर मंजूरी दिलेल्या कामांना ब्रेक लागला. मात्र,खरी अडचण पालकमंत्री सरनाईक यांची झाली आहे.

कारण, त्यांच्याच तथाकथित एका ओएसडीने मुंबईत बसून आपल्या साहेबांच्या वाट्याला आलेल्या कामांचे टक्केवारी घेऊन वाटप केले असून, ही टक्केवारी संबंधित विभागाच्या कार्यालय प्रमुखांच्या मध्यस्थीने ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कार्यकर्ते, ठेकेदारांनी दिली टक्केवारी

बहुतांश गुत्तेदारांनी तसेच विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या टक्केवारीची रक्कम संबंधित ओएसडीला दिली आहे. मात्र, आता कामांनाच स्थगिती आल्यामुळे तथाकथित ओएसडी आणि संबंधित विभाग प्रमुख अडचणीत आले आहेत. घेतलेली टक्केवारीची रक्कम परत मिळणार का, कामाच्या वाटपाचे सूत्र बदलले तर आपल्या कामाचे काय, असे प्रश्न टक्केवारी दिलेल्या गुत्तेदारांसमोर निर्माण झाले आहेत.

दरम्यान, पालकमंत्री सरनाईक यांच्या नावावर टक्केवारीचा उपद्व्याप करणाऱ्या त्या तथाकथित ओएसडीच्या कारभाराचा पालकमंत्री स्वत: छडा लावतील आणि टक्केवारीतून बदनाम ठरलेल्या आपल्या ओएसडीचे आता ‘वासे’ फिरवतील, अशी जिल्ह्याला अपेक्षा आहे. पारदर्शक कारभार करणारे अशी ओळख असलेल्या पालकमंत्री सरनाईक यांच्या स्वभावात टक्केवारीचा विषयच नाही.मात्र, त्यांच्या नावावर कामांचा व्यवसाय मांडणाऱ्या अशा अधिकाऱ्यांचा बंदोबस्त गरज व्यक्त होत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#palkmantri
SendShareTweet
Previous Post

सोलापूर भूकंपाने हादरले ; सव्वा अकरा वाजता भूकंपाचे सौम्य धक्के

Next Post

निरोप समारंभातच हृदयविकाराचा झटका, २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ‍िनीचा अंत

Related Posts

.. अखेर तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

May 5, 2026

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

May 1, 2026

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

May 1, 2026

151 फुटी भगवा ध्वज उभारण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

May 1, 2026

खरीप आढावा बैठकीत २२ कोटींच्या योजनेची माहिती लपवली; आमदार कैलास पाटील यांनी कृषी विभागाचे काढले वाभाडे

May 1, 2026

महाराष्ट्र दिनी धक्कादायक घटना ; वेतनाच्या मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

May 1, 2026
Next Post

निरोप समारंभातच हृदयविकाराचा झटका, २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ‍िनीचा अंत

पालकमंत्र्यांची बदनामी थांबवा, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोबत राहायचे की नाही हे ठरवू

ताज्या घडामोडी

.. अखेर तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

May 5, 2026

Big Breaking मध्यरात्री तुळजापुरात धारधार शस्त्राने हल्ला; युवकाच्या हत्येने तुळजापूर शहर हादरले

May 3, 2026

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

May 1, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group