• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, April 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडले पालकमंत्री,

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 29, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
149
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

धाराशिवच्या रस्ते कामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार

दत्ता कुलकर्णी

धाराशिव,
धाराशिव शहरातील ५९ रस्ते आणि नाल्यांच्या कामांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थगिती दिल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडून ही स्थगिती देण्यात आली असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही याबाबत दाद मागितली असून, लवकरच तोडगा निघून कामे सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सततच्या प्रयत्नातून नगरोत्थान योजनेतून ११७ कोटी रुपयांचा निधी धाराशिव शहरातील रस्ते व नाल्यांच्या विकासासाठी मंजूर झाला. १६ ऑक्टोबर रोजी कार्यारंभ आदेश निघाले, २८ ऑक्टोबर रोजी कामांना प्रत्यक्ष प्रारंभही झाला. पण त्याच दिवशी पालकमंत्री सरनाईक यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे कामांना स्थगिती दिली.

कुलकर्णी म्हणाले, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. शहराच्या विकासाला विलंब लावणारे राजकीय विरोधक जनतेच्या हिताविरुद्ध वागत आहेत. हे काम सुरू झाले असते, तर त्यांच्या अकार्यक्षमतेचा पर्दाफाश झाला असता. त्यामुळेच त्यांनी चुकीची माहिती देऊन विकासकामात अडथळा आणला.

धाराशिव शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असून, एका तरुणाचा जीवही गेला आहे. वृद्ध, महिला, शाळकरी मुले प्रवास करताना अक्षरशः हैराण झाली आहेत.

शहराच्या जनतेच्या हिताचा विचार करून रस्ते व नालींच्या कामांवरील स्थगिती त्वरित उठवावी. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याबाबत दाद मागितली असून, विकासकामे लवकरच सुरू होतील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#guardianminister#victim#propaganda#opponents#appeal#chiefminister#regarding#road#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

पोलिस भरतीची प्रतीक्षा संपली ; धाराशिव जिल्ह्यातील १४८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Next Post

ब्रेकिंग न्यूज..धाराशिव शहरात अखेर रस्त्याचे काम सुरू; धाराशिवकरांची खड्ड्यातून सुटका होणार..!

Related Posts

…अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

April 14, 2026

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

April 13, 2026

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

April 12, 2026

Breaking मेळाव्याआधीच शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात,एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात काय घडणार, जिल्ह्याचे लक्ष

April 12, 2026

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज..धाराशिव शहरात अखेर रस्त्याचे काम सुरू; धाराशिवकरांची खड्ड्यातून सुटका होणार..!

धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकारण तापले ; महिलांचे उपोषण तर महाविकास आघाडीचा रास्ता रोको, होर्डिंग्जमधून सवाल

ताज्या घडामोडी

…अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

April 14, 2026

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

April 13, 2026

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

April 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group