आरंभ मराठीने वस्तुस्थिती मांडताच प्रशासनाकडून दखल
आरंभ मराठी /तुळजापूर
उद्घाटन होऊन पंधरा दिवस झाले तरी वापर होत नसलेल्या तुळजापूरच्या जुन्या बस स्थानकाचा वापरास सुरुवात झाली असून, याबाबत दैनिक आरंभ मराठीमध्ये 15 मे रोजी वृत्त प्रसिद्ध होताच या स्थानकाच्या वापरास आजपासून सुरुवात सुरुवात करण्यात आली आहे.
तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता अद्यावत असे नवीन बस स्थानक उभारणीचे काम गेले दोन वर्षापासून सुरू होते. मात्र अत्यंत संथ गतीने काम होत असल्यामुळे भाविकांची व प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी या स्थानकासाठी वापरण्यात आला आहे.दरम्यान 30 एप्रिल रोजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र उद्घाटनानंतरही अनेक कामे अपुरी
असल्याने हे बस स्थानक वापरले जात नव्हते. त्यात मोकाट जनावरांचा वावर वाढला होता. यासंदर्भात दैनिक आरंभ मराठीमध्ये 15 मे रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत हे बस स्थानक प्रवाशांसाठी दिनांक 17 मेपासून सुरू करण्यात आले असून, पुणे-सोलापूरसाठी जाणाऱ्या गाड्या इथून सोडण्यात येत आहेत.