आरंभ मराठी / धाराशिव
वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली असून, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील धाकटं लोहारा येथे घडली आहे. गावठी कट्ट्याने गोळीबार करण्यात आला असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या गोळीबारात नितीन आरगडे या व्यक्तीला गोळी घालून मारण्यात आले आहे तर दुसरा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. नातलगांमध्ये कौटुंबिक वाद होऊन हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेनंतर गोळीबार करणारा आरोपी रावण रसाळ याने स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार वादातून असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून, लोहारा पोलीस अधिक तपास करत आहेत.