• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, August 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, ‘या’ तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 25, 2026
in Breaking
0
0
SHARES
1.5k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडून दोन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटला असला तरी सत्ता स्थापनेची प्रक्रिया रखडलेली होती. ग्रामविकास विभागाकडून आवश्यक पत्र प्राप्त न झाल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकला नव्हता. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र अखेर आज बुधवार (दि.२५) रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून संबंधित पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या पत्रानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष व सभापती निवडीसाठी आवश्यक बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, या सर्व पहिल्या बैठका २० मार्च २०२६ पूर्वी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यामुळे जिल्हा स्तरावर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम ११(१) आणि कलम ५९(१) नुसार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे अध्यक्ष आणि सभापती निवडीसाठी ही पहिली बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

जिल्हाधिकाऱ्यांना अधिनियमातील तरतुदीनुसार या बैठका नियोजित कालमर्यादेत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये अध्यक्षपदासाठी अंतर्गत स्पर्धा वाढल्याचे चित्र आहे. अध्यक्षपद कोणाला मिळणार यावरून दोन्ही पक्षांमध्ये पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याने महायुतीतील अंतर्गत सत्ता संघर्ष मिटतो की अधिक तीव्र होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#letter#Development#Department#meeting#ZillaParishad#date
SendShareTweet
Previous Post

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

Next Post

करजखेडा ग्रामपंचायतीत सव्वा चार लाखांचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026
Next Post

करजखेडा ग्रामपंचायतीत सव्वा चार लाखांचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 'या' दिवशी होणार, कार्यक्रम जाहीर

ताज्या घडामोडी

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group