• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, June 16, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी आक्रमक, पणन अधिकाऱ्याला घेराव

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 8, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
107
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना मुदतवाढीची प्रतीक्षा

आरंभ मराठी / धाराशिव
सोयाबीन खरेदीसाठी शासनाने दोन वेळा मुदतवाढ दिली. दुसऱ्यांदा दिलेल्या मुदतीचा गुरूवारी (दि.६) शेवटचा दिवस होता. परंतू खरेदी केंद्रावरील नियोजन कोलमडल्याने ग्रामीण भागातून सोयाबीन घेवून आलेल्या वाहनांच्या खरेदी केंद्रांवर रांगा पहावयास मिळाल्या. शुक्रवारी मुदत संपल्यामुळे एकही खरेदी केंद्र सुरू नव्हते.

त्यामुळे संतप्त झालेल्या तुळजापूर येथील शेतकऱ्यांनी धाराशिव येथील कार्यालयात येऊन जिल्हा पणन अधिकारी मनोज कुमार वाजपेयी यांना घेराव घातला. यावेळी वाजपेयी यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना मुदतवाढ करण्यासंदर्भात निवेदन दिले.

सोयाबीन खरेदी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील २१ केंद्रावर १४ हजार २५७ शेतकऱ्यांची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी फक्त ४० टक्के शेतकऱ्यांची खरेदी करण्यात आली आहे तर ६० टक्के शेतकरी मुदतवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील २१ खरेदी केंद्रावर ३५ हजार ४०३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार १५७ शेतकऱ्यांना मेसेज पाठवण्यात आले होते. त्यामध्ये १४ हजार २५७ शेतकऱ्यांचे सोयाबीन प्रत्यक्षात खरेदी केले आहे तर २१ हजार १४६ शेतकरी मुदतवाढ मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.

नाफेडने जिल्हा पणन संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतमाल खरेदीसाठी २१ ठिकाणी खरेदी केंद्र उघडले. १५ ऑक्टोंबरपासून नाफेडने सोयाबीनची खरेदी सुरू केली. सुरूवातीला खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, नंतरच्या काळात बाजारातील दर घसरल्याने नाफेडच्या केंद्राकडे खरेदी वाढली. अचानक खरेदी

वाढल्याने काही काळ बारदानाचा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. परंतू मागणीनंतर खरेदीला पुन्हा ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. वाढीव मुदतीत ५० टक्के शेतकऱ्यांची देखील खरेदी होऊ शकली नाही. आता खरेदीला मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुदतवाढ मिळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू –
धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी आहे. तुळजापूर येथील शेतकऱ्यांनी मुदतवाढीसाठी निवेदन दिले आहे. आमच्या कडूनही शासनाकडे मुदतवाढ मिळावी अशी विनंती केलेली आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळेल अशी शक्यता वाटते.
मनोज कुमार वाजपेयी
जिल्हा पणन अधिकारी, धाराशिव.
जिल्ह्यातील 21 खरेदी केंद्रांची अंतिम आकडेवारी –
खरेदी केंद्र – एकूण नोंदणी – एसएमएस केलेले शेतकरी – खरेदी केलेले शेतकरी – राहिलेले शेतकरी
1) दास्तापुर – 1844 -1844 -1003 – 841
2) कळंब- 3679 – 1594 -1217 – 2462
3) गुंजाटी- 1614 – 905 – 341 – 1273
4) कानेगाव – 1930 – 1930 – 909 – 1021
5) सोनेवाडी – 1037 – 935 – 688 – 349
6) पारा – 526 – 449 – 287 – 239
7) परंडा – 353 – 348 -172 – 181
8) पाथरुड – 1013 – 1002 – 858 – 155
9) धाराशिव – 3379 – 1929 – 923 – 2456
10) ढोकी – 2318 – 1159 – 547 – 1771
11) चोराखळी – 2960 – 2320 – 1223 – 1737
12) उमरगा – 1788 – 904 – 996 – 792
13) नळदुर्ग – 800 – 798 – 317 – 482
14) भूम – 1790 – 1220 – 660 – 730
15) शिराढोण – 624 – 287 – 131 – 493
16) ईट – 1433 – 927 – 632 – 801
17) तुळजापूर – 1776 – 1403 – 486 -1290
18) कनगरा – 1609 – 1196 – 826 – 783
19) चिखली – 2592 – 1302 – 800 – 1792
20) टाकळी बेंबळी – 558 – 551 – 278 – 280
21) वाशी – 2180 – 2154 – 963 – 1217
एकूण – 35403 – 25157 – 14257 – 21146
Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #osmanabad#dharashiv#soybean#farming
SendShareTweet
Previous Post

दुष्टचक्र कायम ; वर्षभरात १५२ शेतकऱ्यांनी स्वतःला संपवले

Next Post

सोयाबीन खरेदीला मुदतवाढ अशक्यच, कारण..गोदामे फुल्ल झाली, जागेअभावी खरेदी बंद: आता तूर, हरभऱ्याच्या खरेदीसाठी नियोजन

Related Posts

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

June 12, 2025

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

June 12, 2025

धाराशिव आणि तुळजापूर बस स्थानकाच्या बोगस कामांची होणार चौकशी

June 12, 2025

तुळजाभवानी मंदिर संस्थान पुण्यातील चितळेंची तुंबडी भरणार,

June 10, 2025

दोन हजार रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाला रंगेहाथ पकडले

May 27, 2025

धाराशिव जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार

May 23, 2025
Next Post

सोयाबीन खरेदीला मुदतवाढ अशक्यच, कारण..गोदामे फुल्ल झाली, जागेअभावी खरेदी बंद: आता तूर, हरभऱ्याच्या खरेदीसाठी नियोजन

मनोज जरांगेंच्या उपस्थितीत धाराशिवची भव्य दुचाकी रॅली, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे जोरदार नियोजन

ताज्या घडामोडी

Big Breaking पत्नीसह दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या; ऑनलाइन रम्मीमध्ये पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

June 16, 2025

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

June 12, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group