प्रतिनिधी / भूम
हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्र बाळगून तहसील कार्यालयासमोरील गल्लीत गोंधळ घालणा-या व्यक्ती विरुध्द पोलीसांची तपास मोहीम सुरू आहे.
भूम शहरातील तहसील कार्यालया समोरील गल्लीत सोमवारी (दि.२१) दुपारी ४ ते ५ च्यासुमारास बिअरबार परमीट रुममधून काही युवक आपसात भांडण करीत बाहेर आले.या दरम्यान तहसील कार्यालया समोरील रोडवर लावलेल्या पांढ-या स्कार्रपिओ गाडीतून २५ ते ३० वयोगटातील तीन तरुण गाडीतून उतरून भांडण करीत असलेल्या युवकाकडे धावत गेले. दरम्यान यापैकी एका तरुणाच्या हातात कोयत्या सारखे धारदार शस्त्र होते,आपसात जोरजोरात भांडण करुन हे तरुण स्कार्रपिओ गाडीतून परंडा रोडवरुन निघून गेले. हा गोंधळ तहसील परिसरातील अनेक लोक पहात होते.
दरम्यान घडलेल्या प्रकारची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले.घडलेला प्रकार नागरिकांकडून जाणून घेतला व ते गाडी व गाडीत असलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. दरम्यान हा प्रकार तब्बल १५ ते २० मिनिट चालू होता. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते.