• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, October 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

14 महिन्यात शिवशाही बसचे 356 अपघात; 20 जणांचा मृत्यू, पूर्व प्रशिक्षण दिल्याशिवाय गाड्या ताब्यात न देण्याच्या सूचना

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 20, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
281
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याचे सरकारचे प्रयत्न

प्रतिनिधी / मुंबई

राज्यात शिवशाही बसच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून, 14 महिन्यात या गाड्यांचे 356 अपघात झाले आहेत. त्यात एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातांचे हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, यासाठी एसटीमार्फत चालक-वाहकांना प्रशिक्षण तसेच वाहनांमधील तांत्रिक दोष दूर करण्यावर भर दिला जात असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.

शिवशाही बसला आग लागण्याच्या आणि अपघात होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. भुसे यांनी ही माहिती दिली.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की, प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी 2017-18 मध्ये शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली. सन 2022-23 या आर्थिक वर्षात राज्य परिवहन स्व-मालकीच्या शिवशाही बसचे 245 अपघात झाले असून भाडेतत्वावरील शिवशाही बसचे 60 असे एकूण 305 अपघात झाले आहेत. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सन 2023-24 मध्ये मे 2023 अखेर स्वमालकीच्या शिवशाही बसचे 47 अपघात झाले असून भाडेतत्वावरील शिवशाही बसचे चार असे एकूण 51 अपघात झाले असून यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

स्वमालकीच्या शिवशाही बसवरील चालकांना शिवशाही बस चालविण्याचे पूर्व प्रशिक्षण दिल्याशिवाय शिवशाही नियतावर कामगिरी देण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व विभागांना देण्यात आलेल्या आहेत. रा.प. बस चालकांना शिवशाही बसचे प्रशिक्षण देण्यासाठी रा.प. मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी येथे रा.प. महामंडळातील सुमारे 100 वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) यांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक विभागातील चार प्रशिक्षित चालकांमार्फत सर्व विभागातील चालकांना नियमितपणे आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना नियमितपणे करण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री.भुसे यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा आतापर्यंत 12 कोटी 89 लाखांहून प्रवाशांनी लाभ घेतला असून यासाठी एसटीला 662 कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत योजनेचा 17 कोटी 42 लाखांहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला असून यासाठी 505 कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली. चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना आरोग्य तपासणीसाठी तीन हजार रुपये, वेतन व भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. 500 हून अधिक बसस्थानकांचे सुशोभीकरण, स्वच्छता, बांधणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. एसटीच्या ताफ्यात नवीन ई-बस घेण्यात येणार आहेत. तथापि, त्यांचा सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी जेथे आवश्यकता आहे तेथे बससेवा सुरू करण्यात येईल, असे सांगून नाशिक येथील महानगरपालिकेची सध्या बंद असलेली बससेवा तातडीने सुरू होण्याबाबत आजच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नासंदर्भात बोलताना सांगितले.

या लक्षवेधीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य सर्वश्री अनिकेत तटकरे, किशोर दराडे, प्रवीण दरेकर, नरेंद्र दराडे, ॲड. अनिल परब, कपिल पाटील, शशिकांत शिंदे, श्रीमती उमा खापरे आदींनी सहभाग घेतला.

SendShareTweet
Previous Post

पूरपरिस्थिती; राज्यातल्या आठ जिल्ह्यांतील शाळांना उद्या सुटी, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला निर्णय

Next Post

शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या नांदूरच्या 4 टवाळखोर तरुणांवर वाशीमध्ये गुन्हा दाखल

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या नांदूरच्या 4 टवाळखोर तरुणांवर वाशीमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र भूषण कार्यक्रम अपघातप्रकरणी विधानसभेत प्रचंड गदारोळ, मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांचा सभात्याग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

October 10, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

October 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group