• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 14, 2026
in धाराशिव जिल्हा
0
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

गणेशोत्सवाच्या उत्साहावर धाराशिव शहरातील अर्धवट रस्ते आणि नालीच्या कामांचे विघ्न आले आहे. वर्षभरापासून सुरू असलेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण नसल्याने गणेश मंडळांना बाप्पांच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी खड्डे, उंच-सखल नाल्या आणि धोकादायक उतारांचा सामना करावा लागणार आहे. गेल्यावर्षीचीच परिस्थिती यंदाही कायम राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, मुंबईत आठवडाभरात श्री.गणेशाच्या आगमनावेळी दोन दुर्घटना घडल्या, धाराशिवचे झोपलेले,सुस्तावलेले प्रशासन अशाच दुर्घटनांची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जिजाऊ चौक ते संत गाडगे महाराज चौक आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम झाले असले तरी अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. नालीसाठी खोदलेले खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. संत गाडगे महाराज चौक ते जिल्हाधिकारी बंगला या मार्गावरही रस्त्यालगत नालीसाठी खोदलेले खड्डे धोकादायक आहेत.विशेष म्हणजे बाप्पांच्या स्वागतासाठी तसेच निरोपासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. जिल्हाधिकारी बंगल्यासमोर सिमेंट रस्ता संपताना निर्माण झालेला मोठा उतारही मिरवणुकीतील वाहनांसाठी अडचणीचा ठरू शकतो.

जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याच्या कामाला ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सुरुवात झाली. कामाला जवळपास वर्ष होत आले तरी रस्त्याच्या दोन्ही बाजू पूर्ण झालेल्या नाहीत. काही ठिकाणी सिमेंट रस्त्याला तडे गेल्याचेही दिसून आले. त्यामुळे कामाच्या दर्जासोबतच कामाच्या गतीवरही प्रश्न उपस्थित होत असताना ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नाही.

सध्या नालीचे काम सुरू असून काही ठिकाणी नाली रस्त्यापेक्षा उंच तर काही ठिकाणी खाली आहे. नालीच्या कामावर नियमित पाणी मारले जात नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
_

पाऊस नाही, तरी कामे संथ, सादरीकरण कसे करणार ?

गेल्या दोन महिन्यांपासून शहरात पाऊस नसल्याने रस्ते आणि नालीची कामे वेगाने पूर्ण करण्याची संधी होती. मात्र गणेशोत्सव आला तरी मिरवणूक मार्गांवरील कामे अपूर्णच आहेत. दोन-दोन महिन्यांपासून सादरीकरणाची तयारी करणाऱ्या गणेश मंडळांना आता मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळ्यांचीही चिंता आहे.

SendShareTweet
Previous Post

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

Related Posts

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026

ताज्या घडामोडी

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल

बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल

September 13, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group