• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, September 30, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 15, 2026
in राजकारण
0
खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद
0
SHARES
1.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

धाराशिव / आरंभ मराठी

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी आज स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ओमराजे निंबाळकर समर्थकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, पालकमंत्री प्रताप सरनाईक भोजन करून निवेदने स्वीकारत असतानाच दोन कार्यकर्त्यांमध्ये अचानक शाब्दिक चकमक उडाल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बेंबळी येथील कार्यकर्ते मोईन खान आणि वरुडा येथील कार्यकर्ते सचिन शेंडगे यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर दोघांकडून शिवीगाळही करण्यात आली. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांचे लक्ष या वादाकडे गेले. परिस्थिती चिघळण्यापूर्वीच काही कार्यकर्त्यांनी दोघांनाही आवर घालत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू डॉ. जयराजे यांनीही मध्यस्थी करत दोन्ही कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. त्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटवण्यात आला. या घटनेत नेमके कोणत्या कारणावरून वाद झाला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने कार्यक्रमस्थळी तसेच राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा रंगली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक हे पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर ओमराजे यांनी पालकमंत्र्यांसाठी आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री सरनाईक यांनी भोजन केल्यानंतर उपस्थितांकडून निवेदने स्वीकारण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी बाजूला दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने काही काळ कार्यक्रमाच्या उत्साहावर विरजण पडले. मात्र, उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती अधिक चिघळली नाही. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या जुन्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत नव्याने शिवसेनेत सक्रिय झालेले समर्थक यांच्यात काही प्रमाणात धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात झालेल्या या वादाकडेही त्याच पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. मात्र, सदर वादाचा पक्षांतर्गत मतभेदांशी थेट संबंध आहे की अन्य कोणत्या कारणामुळे वाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

SendShareTweet
Previous Post

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

Next Post

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Related Posts

..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..?    पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..? पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

September 25, 2026
दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

September 23, 2026
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

September 22, 2026
मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा  पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

September 16, 2026
‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

September 16, 2026
पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
Next Post
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

ताज्या घडामोडी

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात  कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त;   धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

September 28, 2026
शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का?          _  धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _ धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group