• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 12, 2026
in Breaking
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

नीट पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून एनटीएकडून परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे देशातील 23 लाख विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच National Testing Agency (NTA) ने एक पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तपास यंत्रणांकडून या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तपासादरम्यान असे समोर आले आहे की, नीट परीक्षेच्या तब्बल १५ दिवसांपासून ते एक महिना आधीच विद्यार्थ्यांमध्ये एक तथाकथित ‘गेस पेपर’ किंवा प्रश्नसंच मोठ्या प्रमाणावर फिरत होता. या प्रश्नसंचामध्ये जवळपास १५० पाने आणि सुमारे ४१० प्रश्नांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या ४१० प्रश्नांपैकी तब्बल १२० प्रश्न हे रसायनशास्त्र (Chemistry) विषयातील मूळ परीक्षेतील प्रश्नांशी अक्षरशः जुळल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पेपरफुटीचा संशय अधिकच गडद झाला आहे.

काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट यूजी परीक्षेतील ७२० गुणांपैकी सुमारे ६०० गुणांचे प्रश्न काही विद्यार्थ्यांना परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधीच उपलब्ध झाले होते. या प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तपास यंत्रणा सध्या या कथित ‘गेस पेपर’च्या माध्यमातून कोणती फसवणूक, गैरप्रकार किंवा गुन्हेगारी स्वरूपाची कृती झाली का, याचा सखोल तपास करत आहेत.

या प्रकरणात विविध राज्यांतील संशयितांची चौकशी सुरू असून अनेक डिजिटल पुरावेही तपासले जात असल्याची माहिती समोर येत आहे. ३ मे रोजी धाराशिव शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती.

अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतर आपल्या गुणांचा अंदाज काढून निकालाची प्रतीक्षा सुरू केली होती. मात्र, परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची शक्यता समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही मोठा मानसिक धक्का बसला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#NEET#exam#canceled#paper#case#students#Dharashiv
SendShareTweet
Previous Post

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

Related Posts

Big Breaking मध्यरात्री तुळजापुरात धारधार शस्त्राने हल्ला; युवकाच्या हत्येने तुळजापूर शहर हादरले

May 3, 2026

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, ‘या’ तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

February 25, 2026

ब्रेकिंग | तडवळ्यात गावठी कट्टा व तीन फायटरसह आरोपी जेरबंद, ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

January 11, 2026

Breaking ५ हजारांची लाच घेताना समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

December 31, 2025

Breaking | तुळजाभवानी मंदिरात तोतया आयएएस अधिकारी पकडला; व्हीआयपी दर्शनासाठी घुसखोरीचा प्रयत्न उघड

December 23, 2025

ब्रेकिंग | धाराशिव जिल्हा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने; उमरगा, कळंब, परांडा शिवसेनेकडे, तुळजापूर–नळदुर्ग–मुरुम भाजपकडे; धाराशिव व भूममध्ये अटीतटीची लढत

December 21, 2025

ताज्या घडामोडी

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group