• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, June 25, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 10, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
281
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

नळदुर्ग पोलिसांनी तब्बल १० कोटी ३८ लाख रुपयांच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणातील मुख्य आरोपीला ओडिशा राज्यातील अतिशय दुर्गम आणि नक्षलप्रभावित भागातून अटक करत धाडसी मोहिम यशस्वी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गुप्त आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही मोठी कारवाई केली.

दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी रात्री नळदुर्ग पोलिसांनी नाकाबंदी सुरू असताना एका संशयित कारला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना पाहताच कारमधील आरोपींनी त्यांच्या ताब्यातील हशिश ऑईल असलेली बॅग रस्त्यावर फेकून पळ काढला. घटनास्थळी पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत तब्बल १० कोटी ३८ लाख २० हजार रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११४/२०२६ अन्वये NDPS कायद्यातील कलम ८(क), २०(ब), २०(ii)(C), २५ व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवली. यापूर्वी दोन आरोपींना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून अटक करण्यात आली होती. मात्र हशिश ऑईलचा मुख्य पुरवठादार आणि विक्रेता कोण, याचा शोध सुरू असतानाच तपासात ओडिशा राज्यातील प्रसेनजित ख्रिमहन दास (वय ३३) याचे नाव समोर आले. आरोपीचे केवळ नाव उपलब्ध होते. तो नेमका कुठे राहतो, कसा दिसतो याबाबत कोणतीही ठोस माहिती नव्हती.

त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. दरम्यान, दि. ६ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महेबुब अरब आणि रोहित दंडनाईक यांचे विशेष पथक ओडिशा राज्यात रवाना झाले.

तपासादरम्यान आरोपी हा ओडिशातील अतिशय दुर्गम, डोंगराळ आणि नक्षलप्रभावित भागात वास्तव्यास असल्याची माहिती पथकाला मिळाली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या विशेष सूचनांनुसार पथकाने जनतापाई (ओडिशा) या नक्षलग्रस्त भागात धाडसी कारवाई करत आरोपी प्रसेनजित ख्रिमहन दास याला ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी नळदुर्ग पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#case#arrested#Odisha
SendShareTweet
Previous Post

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

Next Post

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

ताज्या घडामोडी

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group