• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

केशर आंबा उत्पादकांना हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत जाहीर करा : आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 30, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
76
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

यावर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि हवामानातील तीव्र बदलामुळे धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, या शेतकऱ्यांना कोकणच्या धर्तीवर हेक्टरी २२,५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार घाडगे-पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत केशर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली असून सध्या सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड आहे. येथील हवामान व भौगोलिक परिस्थितीमुळे धाराशिवमधील केशर आंब्याला विशिष्ट चव व गोडवा प्राप्त झाला असून, काही शेतकरी निर्यातीसाठी देखील हा आंबा पाठवतात.

त्यामुळे या पिकाला आर्थिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, यावर्षी बदलत्या हवामानाचा मोठा फटका आंबा बागांना बसला आहे. मोहर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, फळमाशीचा वाढलेला प्रादुर्भाव तसेच काही ठिकाणी झालेली गारपीट यामुळे आंबा उत्पादनात ८० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. परिणामी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत.

या पार्श्वभूमीवर कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत जाहीर करून ती वितरित देखील केली आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही, ही बाब अन्यायकारक असल्याचे आमदारांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी कृषी विभागाच्या पथकासह धाराशिव जिल्ह्यातील चार तालुक्यांतील आंबा बागांची पाहणी केली होती. या पाहणीत यावर्षी उत्पादनात किमान ५० टक्के घट होणार असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी नुकसान भरपाईसंदर्भात सविस्तर अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठवला आहे. मात्र या अहवालावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून, कोकणच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी आमदार घाडगे-पाटील यांनी केली आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी फळबागेचा विमा घेतला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट फळपीक विम्याचा लाभ मिळावा, यासाठीही शासनाने निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शेतकरी या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्यास संकटात सापडलेल्या आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Announce#hectare#mango#MLA#KailasPatil#demands
SendShareTweet
Previous Post

पाच तोळे सोन्यासाठी छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

मागण्या मान्य झाल्याने कृषी सेवा केंद्र चालकांचा संप मागे

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

मागण्या मान्य झाल्याने कृषी सेवा केंद्र चालकांचा संप मागे

‘आपले सरकार’ सेवा केंद्राची साईट ठप्प; RTE व MPSC चे अर्ज करताना अडचणी

ताज्या घडामोडी

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या

June 13, 2026

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्याला ‘इतक्या’कोटींची मदत मंजूर

June 13, 2026

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group