• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, July 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकास कामांचे होणार भूमिपूजन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 9, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
447
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

१८६५ कोटींच्या आराखड्याला गती मिळणार

आरंभ मराठी / मुंबई

कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात या संदर्भात आज आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार राणाजगजीतसिंह पाटील, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाने सुमारे १८६५ कोटी रुपयांच्या श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ४२१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विकास कामांमुळे बाधित होणाऱ्या १०५ खाजगी मालमत्तांपैकी सुमारे ७५ टक्के मालमत्ता धारकांशी शासनाने यशस्वी वाटाघाटी केल्या आहेत. त्यामुळे उर्वरित विकास कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास भव्य व दिव्य स्वरूपात व्हावा, यासाठी वेळेचे काटेकोर पालन करून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत रामदरा तलावाजवळ विकसित होणाऱ्या शिवसृष्टी उद्यानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच मंदिर परिसरातील आठ जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि आठ कुंडांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय पार्किंग प्लाझा, प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, भक्तनिवास आणि दर्शन मंडप यांसारख्या कामांबाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या. तुळजापूर शहराचा वेगाने विस्तार होत असल्याने शहरासाठी स्वतंत्र ‘मास्टर प्लॅन’ तयार करून सुनियोजित विकास साधण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या. या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत समिती स्थापन करण्याचे निर्देश –

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांविषयी समाजात नितांत आदर आहे. त्यांच्या प्रेरणादायी स्मारकांची उभारणी व्हावी, मात्र काही ठिकाणी शासनाचे निकष न पाळता अनधिकृतपणे पुतळे उभारले जात असून त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन करावी आणि इच्छुकांना शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार पुतळे उभारण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे सामाजिक सलोखा अबाधित राहील आणि महापुरुषांचा सन्मानही राखला जाईल, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासोबतच मुख्यमंत्री शेतकरी सौर पंप योजना, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच जलजीवन मिशनअंतर्गत पाणीटंचाई या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत संबंधित विभागांनी आपल्या कामकाजाचा अद्ययावत आढावा सादर केला. तसेच बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Tuljabhavanitemple#development#work#Information#GuardianMinister#PratapSarnaik
SendShareTweet
Previous Post

धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; दोन विद्यमान नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post

‘या’ कारणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वर्षभर ब्रेक

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

'या' कारणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वर्षभर ब्रेक

काँग्रेसमध्ये संघटन मजबुतीकरणाचा बिगुल; जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग, तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

ताज्या घडामोडी

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group