• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, April 10, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 23, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
418
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

खरीप 2020 हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीबाबतच्या पिक विमा प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, निकालाचा थेट परिणाम त्यांच्या हक्काच्या विमा रकमेवर होणार आहे.

2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अत्यल्प रक्कम देण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम वितरित करण्याचे निर्देश दिले होते. तरीही कंपनीने आदेशाची अंमलबजावणी न केल्याने प्रकरण न्यायालयात गेले.

प्रथम उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावण्यांमध्ये न्यायालयांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने प्रति हेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले होते. त्या अनुषंगाने आतापर्यंत सुमारे ३७६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अद्याप सुमारे २२८ कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.

विमा कंपनीने पुन्हा एकदा निकालाला आव्हान देत याचिका दाखल केली होती. त्यावर २४ नोव्हेंबर २०२५ रोजी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने पुन्हा शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत, दोन महिन्यांच्या आत म्हणजे २४ जानेवारी २०२६ पर्यंत प्रलंबित रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले होते.
विमा कंपनीने यापूर्वी ७५ कोटी रुपये न्यायालयात जमा केले होते. त्या रकमेवरील सुमारे १७ कोटी रुपये व्याजासह एकूण ९२.९३ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून विमा कंपनीला १३४ कोटी रुपये देणे बाकी होते.

११ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केल्याचे पत्र काढले. मात्र दहा दिवस उलटूनही संबंधित रक्कम प्रत्यक्षात जमा न झाल्याने प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. राज्य सरकारकडून वेळेत निधी न मिळाल्यामुळे विमा कंपनीला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी मिळाली आहे. आजच्या सुनावणीत या निधीविषयक विलंबाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

आज जर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती दिली, तर धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम अत्यंत महत्त्वाची आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून, विभागातील काही अधिकारी आवश्यक कागदपत्रांसह दिल्लीला रवाना झाले आहेत.

न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू ठोसपणे मांडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे दिसते. आजच्या सुनावणीत नेमका काय निकाल लागतो, निधी वितरणाला गती मिळते का, की स्थगिती मिळते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#insurance#case#SupremeCourt#farmers#decision
SendShareTweet
Previous Post

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर परिणाम

Next Post

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, ‘या’ तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

Related Posts

मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकास कामांचे होणार भूमिपूजन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

April 9, 2026

धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; दोन विद्यमान नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

April 9, 2026

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

April 9, 2026

आधार व्हॅलिडेशनच्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षक ‘अतिरिक्त’ ठरण्याचा प्रश्न गंभीर; शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम

April 9, 2026

फिर्याद देण्यासाठी गेलेल्या नागरिकाचा पोलिस निरीक्षकांनीच दाबला गळा; शहर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

April 8, 2026

धाराशिव जिल्हा वार्षिक योजनेत मोठा गैरव्यवहार? प्रशासकीय मान्यता व निधी वितरणातील अनियमिततेची आमदार कैलास पाटील यांची मागणी

April 8, 2026
Next Post

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, 'या' तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

करजखेडा ग्रामपंचायतीत सव्वा चार लाखांचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकास कामांचे होणार भूमिपूजन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

April 9, 2026

धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; दोन विद्यमान नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

April 9, 2026

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

April 9, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group