• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, June 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून १५० कोटींचा निधी वितरित

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 6, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी | धाराशिव

राज्यातील ग्रामीण तसेच अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना चालना मिळावी आणि हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत, या उद्देशाने राज्य शासनाने रेल्वे प्रकल्पांमध्ये आर्थिक सहभाग देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याच धोरणानुसार सोलापूर–तुळजापूर–धाराशिव (उस्मानाबाद) या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या हिश्श्यातील १५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत शासनाने परिपत्रक शुक्रवारी (दि.६) जारी केले आहे.

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव हा नवीन रेल्वेमार्ग प्रकल्प मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. या प्रकल्पास सुरुवातीला अंदाजे ९०४.९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. त्यानुसार एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच ४५२.४६ कोटी रुपये राज्य शासनाकडून देण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, कालांतराने जमीन संपादन, बांधकाम साहित्याचे दर, तांत्रिक बदल आदी विविध कारणांमुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली. रेल्वे प्रशासनाच्या विनंतीनुसार प्रकल्पाचा सुधारित अंदाजपत्रक ३२९५.७४ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला. यानुसार राज्य शासनाचा ५० टक्के सहभाग म्हणजे १६४७.८७ कोटी रुपये देण्यास दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी यापूर्वी राज्य शासनाच्या हिश्श्यातून ४० कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य हिश्श्यापैकी आणखी १५० कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन २०२५-२६ मध्ये झालेल्या प्रत्यक्ष खर्चानुसार राज्य शासनाचा हिस्सा अदा करण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने ४ जुलै २०२५ रोजी राज्य शासनाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने हा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास तुळजापूरसारख्या धार्मिक पर्यटनस्थळाला मोठा फायदा होणार असून, मराठवाड्यातील दळणवळण, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळणार आहे. राज्य शासनाच्या या निधी वितरणामुळे प्रकल्पाच्या कामाला अपेक्षित गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#crores$fund#distributed#state#government#Solapur#Tuljapur#railway#project#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातून गूढ आवाजांचे जोरदार धक्के; भिंती हलल्या, खिडक्या-दारे थरथरली

Next Post

Breaking news आठवड्यात दुसरी दुर्घटना: फटाका कारखान्यात पुन्हा स्फोट

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

Breaking news आठवड्यात दुसरी दुर्घटना: फटाका कारखान्यात पुन्हा स्फोट

मतदानाला संथ प्रतिसाद पहिल्या दोन तासात 'इतके' टक्के मतदान

ताज्या घडामोडी

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

Breaking शिवसेनेची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; ओमराजेंच्या प्रवेशानंतर पक्षाचा मोठा निर्णय

June 23, 2026
विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group