• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, March 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी प्रशासनाचा महाळंगी गावात गनिमीकावा ; शेतकऱ्यांचा विरोध तरीही मोजणी सुरू

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 11, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
644
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी धाराशिव तालुक्यातील महाळंगी गावात गेलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

आज (दि.११) सकाळीच उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख हे महसूल व कृषी विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना घेऊन महाळंगी गावात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी दाखल झाले. मोजणीसाठी शेतकऱ्यांना एक दिवस अगोदर नोटीस दिली होती.

रविवार असतानाही शेतकऱ्यांना काल रात्री नोटीस देऊन आज गनिमीकावा करत अधिकारी मोजणीसाठी गेले. मात्र, याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी ज्या हरकती दिल्या होत्या त्यावर कसलीही सुनावणी न घेता अचानक मोजणीसाठी का आलात? असा सवाल शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांना केला. यावर देशमुख यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली.

मात्र, काही शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शविला. महाळंगी गावातील १३ शेतकऱ्यांच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. यातील ९ शेतकऱ्यांनी प्रशासनाला मोजणीसाठी विरोध दर्शविला आहे. तर ४ शेतकऱ्यांचा मोजणीसाठी पाठिंबा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मागील काही काळापासून शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी धाराशिव जिल्ह्यात मोठा विरोध झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील १९ गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. यावर बाधित शेतकऱ्यांनी मागील वर्षी ४५० हरकती नोंदविलेल्या आहेत.

या हरकतींवर कसलीच सुनावणी न घेता प्रशासनाचे अधिकारी थेट मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात अचानक जात आहेत. महाळंगी गावात देखील प्रशासनाने गनिमीकावा करत अचानक जाऊन मोजणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे.

महाळंगी गावातील काही शेतकऱ्यांनी मोजणीसाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यामुळे तिथे मोजणी सुरू झाली आहे. राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा प्रशासनाला ३० सप्टेंबरपूर्वी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश दिले आहेत.

मात्र, शेतकऱ्यांना विरोध वाढतच असल्यामुळे प्रशासनासमोर मोजणी कशी पूर्ण करावी असा प्रश्न पडला आहे. धाराशिव जिल्ह्यातील १९ पैकी एकाही गावात मोजणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. प्रशासन आता मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरसावले असून येत्या काळात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात संघर्ष वाढणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #osmanabad#dharashiv
SendShareTweet
Previous Post

रामपाल महाराजाची भक्ती करतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून

Next Post

भानसगाव शिवारात पुन्हा वाघाचा थरार! बैलाचा फडशा, म्हशीवरही हल्ला,

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अर्चनाताई पाटील व उषाताई गायकवाड रिंगणात; महाविकास आघाडी देखील मैदानात

March 13, 2026

हॉटेलला खासगी सुरक्षा रक्षकांचा पहारा; सहलीवरचे जिल्हा परिषद सदस्य कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दाखल

March 13, 2026

धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा; हॉटेल व्यवसायावर संक्रांत

March 11, 2026

कळंबच्या नगराध्यक्षांनी नागरिकांची माफी मागितली, पण बेजबाबदार लोकांना दिला ‘हा’ इशारा

March 9, 2026

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीत २७ कोटींची वाढ, यंदा ‘इतकी’ तरतूद

March 9, 2026
Next Post

भानसगाव शिवारात पुन्हा वाघाचा थरार! बैलाचा फडशा, म्हशीवरही हल्ला,

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दोन दिवसांचा धाराशिव दौरा; अनेक कार्यक्रमांना राहणार उपस्थित

ताज्या घडामोडी

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अर्चनाताई पाटील व उषाताई गायकवाड रिंगणात; महाविकास आघाडी देखील मैदानात

March 13, 2026

हॉटेलला खासगी सुरक्षा रक्षकांचा पहारा; सहलीवरचे जिल्हा परिषद सदस्य कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दाखल

March 13, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group