प्रतिनिधी / कळंब
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भाटशिरपुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावातील माजी सैनिकांचा मानाचा फेटा,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला तसेच ग्रामपंचायतच्या वतीने शाळेच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात आली.दरम्यान, शाळेच्या शिक्षकांनी शाळेसाठी वेगवेगळ्या स्वरूपात योगदान दिले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, निबंध,चित्रकला,सुंदर हस्ताक्षर व सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत इयत्ता १ ली ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. सकाळी गावातून वाजत – गाजत उत्साहात प्रभात फेरी काढून मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्या हस्ते ध्वरारोहण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याच्या इतिहास उलगडुन सांगितला. तसेच देश भक्तीपर गीतावर विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले.माजी सैनिकांच्या वतीने सुर्यकांत खापे यांनी सैन्यातील आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुनिता दिलीप वाघमारे,चेअरमन अच्यूत बापु गायकवाड,उपसरपंच सुर्यकांत खापे, संभाजी ब्रिग्रेडचे अतुल गायकवाड,दिलीपराव वाघमारे,विकास गायकवाड, रमेश रितपुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियंकाताई गायकवाड ,उपाध्यक्षा कीर्ती झोंबाडे, ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सचिन तामाने,शहाजी बनसोडे,राजाभाऊ शिंदे,लिंबराज सुरवसे, प्रमोदिनी होळे, रंजना थोरात यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी केले. सुत्रसंचलन श्रीकांत तांबारे तर आभार अमोल बाभळे यांनी मानले.
या माजी सैनिकांचा गौरव
बाबुलाल बाशुमियाँ शेख,साईबाबा महेबुब शेख,निजाम शेख,शैफुद्दीन बाबुलाल शेख,युन्नुस गफुर शेख,सुर्यकांत बाबासाहेब खापे,गोपाळ अभिमान रितपुरे या माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला.