प्रतिनिधी / शिराढोण
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा (आदर्श जि. प .शाळा )येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली.
यामध्ये अध्यक्ष म्हणून शैलेंद्र छत्रभूज पाटील यांची सलग दुसऱ्यांदा तर उपाध्यक्षपदी अनुसया महेश धाकतोडे यांची निवड करण्यात आली. शालेय समितीच्या एकूण 18 जागेपैकी 12 जागा या पालकांमधून मतदान घेऊन निवड पद्धतीने निवड करण्यात आली. यामध्ये शैलेंद्र पाटील यांना अध्यक्षपद मिळाले. उपाध्यक्षपदी अनुसया धाकतोडे या निवडून आल्या. यावेळी शैलेंद्र पाटील यांनी मागील कालावधीमध्ये केलेल्या कामाचा आढावा पालकांसमोर मांडला, त्याचबरोबर पालकांसोबत शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन जाधव यांनी संवाद साधला.शाळेत समितीत शैलेंद्र छत्रभूज पाटील, गोविंद दत्तू वाघमारे, आबासाहेब राघू सहाने, अनुसया महेश धाकतोडे, सतीश नारायण शिंपले, वैभव विजय कोंडेकर, रेश्मा तुषित नाईकवाडे ,रागिनी गणेश शिंदे, सारिका राम जाधवर, राजपाल रावसाहेब देशमुख, परवीन अजहर सय्यद, प्रगती सचिन पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडीदरम्यान शाळेचे सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग उपस्थित होते.निवडीबद्दल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.