प्रतिनिधी / वाशी
भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यकारिणीची घोषणा बुधवारी (दि.3) करण्यात आली. नवनियुक्त भाजपा तालुकाध्यक्ष राजगुरू महाराज कुकडे यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा समावेश करत कार्यकारणी जाहीर केली. कार्यकरणीत दिपक कवडे यांना युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपविणायत आली असून, 6 उपतालुकाध्यक्ष 3, सरचिटणीस, 6 चिटणीस, 15 कार्यकारणी सदस्य यासह विविध आघाड्यांचे तालुका प्रमुख घोषित करण्यात आले.तालुकाध्यक्ष कुकडे यांनी पुढीलप्रमाणे कार्यकारिणी जाहीर असून, उपतालुकाध्यक्षपदी बावीचे सरपंच संजयपापा शिंदे, विलासराव देशमुख, अमर शिंदे, दादाराव भराटे, अनिल जगताप, नवनाथ मोटे यांची निवड करण्यात आली. नगरसेवक बळवंतराव कवडे यांची शहराध्यक्षपदी तर सुमित आहिरे यांची अनु. जाती मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. किसान मोर्चा अध्यक्ष अंगद शेरकर, ओबीसी सेल अध्यक्ष महारुद्र खोले, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष रसीद तांबोळी, महिला मोर्चा अध्यक्ष त्रिशाला देशमुख, सहकार सेल नानासाहेब कवडे, सरचिटणीसपदी सतीश मोरे, सुधीर घोलप, प्रशांत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. सोशल मीडिया संयोजकपदी गणेश बोराडे यांची तर प्रसिद्धी प्रमुखपदी शहाजी चेडे यांची निवड करण्यात आली. आगामी काळात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितिच्या निवडणुका होणार असून, हे निवडणुकांचेच वर्ष आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्या माध्यमातून पक्षविस्तार करणे हा उद्देश समोर ठेवून तालुकाध्यक्ष राजगुरू कुकडे यांनी जवळपास पन्नास पेक्षा जास्त सदस्यांची नव्या दमाची तालुका कार्यकारणी जाहीर केली आहे.