• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिवकरांनो, वाचा आणि थंड बसा..खड्ड्याने तरुणाचा जीव घेतला, अजून किती आकडे मोजायचे ?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 18, 2024
in Breaking
0
0
SHARES
5.8k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यामुळे होणारे अपघात, याबद्दल कुणीही राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी चकार शब्द काढायला तयार नाहीत. नागरिकही मुकाटपणे हे सहन करत आहेत. ‘आरंभ मराठी’ने शुक्रवारी या खड्ड्यांबाबत संवेदनाहीन बांधकाम आणि नगर पालिकेच्या अधिकाऱ्यावर वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान,दुर्दैवाने गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शहरातील एका 22 वर्षीय व्यवसायिक तरुणाचा मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे.त्यामुळे आपण नागरिक म्हणून अजून जणांचे बळी पडण्याची वाट पाहतोय, कोणत्याही राजकीय पक्षांना काहीही देणंघेणं नसेल तर नागरिकांनी उठाव करण्याची गरज आहे.

ओंकार जयदेव जाधवर (22, रा.गवळी वाडा),हा सराफा व्यवसायिक तरुण गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून बस स्थानकाकडे जात असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान अंबिका मशिन्स या दुकानासमोर असलेल्या खड्ड्यात पडला.खड्ड्यांमुळे दुचाकी वरून पडलेल्या ओंकारच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले. मात्र सोलापूरला जाताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.त्याच्या कुटुंबावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ओंकार हा शहरात व्यवसाय करत होता. त्यामुळे व्यापारी महासंघाच्या वतीने नगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आरंभ मराठी ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेलं वृत्त;अधिकाऱ्यांची शहरातील रस्त्यावरून वरात काढा अन् पालकमंत्र्यांसह आमदारांना स्वागतासाठी उभं करा

शहरातल्या प्रत्येक रस्त्यांवर गतिरोधक बसवावे लागतील, इतकी सुसाट आणि विना सायास वाहने धावत आहेत. कुठेही अडथळा नाही की,खड्ड्यांचा त्रास नाही. मुख्य असो की अंतर्गत सगळे रस्ते कसे गुळगुळीत आहेत. खड्डा तर शोधूनही सापडणार नाही. खड्ड्यांची साधी कुणकुण लागली तरी नगर परिषदेच्या आणि बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम धावत जाते आणि रस्ता पूर्ववत होतो, अगदी महानगरात सुध्दा इतकी सजगता, तत्परता नसेल !. मग अशा कर्तव्य तत्पर अधिकाऱ्यांचा मान-सन्मान कोण करणार, धाराशिवकरांनी एवढं तरी आता करावं. सजवलेल्या रथावरून पालिकेच्या आणि सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची वाजत गाजत शहरातल्या सगळ्या गुळगुळीत रस्त्यांवरून वरात काढावी. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी चौकाचौकात हार घेऊन स्वागताला उभं राहावं.कारण असे अधिकारी पुन्हा होणे नाही.

धाराशिवातील शहराच्या रस्त्यांचे कौतुक आणि त्यावरून होणारे राजकारण काही केल्या संपत नाही. रस्त्यावरून होणाऱ्या राजकारणाचा आणि आरोप-प्रत्यारोपाचा धाराशिवकरांना अक्षरश: वीट आलाय. नगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून ३ वर्षे उलटली आणि विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ अंतिम टप्प्यात आहे. पालिकेवर खादाड अधिकाऱ्यांची तर सार्वजन‍िक बांधकाम विभागात माना डोलावणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची सत्ता आहे. भूयारी गटारसाठी खोदलेल्या रस्त्यांची अद्याप दुरूस्ती नाही.

रस्त्यांची नवीन कामे झाली नाहीत आणि आहेत त्या रस्त्यांवर खड्डे करून ठेवण्यात आले आहेत. पालिका भ्रष्टाचारांच्या चौकशीच्या फेऱ्यातून अद्याप बाहेर पडलेली नाही,त्यामुळे विकास कामांचा पत्ताच नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हातलाई मंदिरापर्यंत बार्शी रोडची अवस्था जीवघेणी आहे.खड्ड्यांमुळे अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले. शैक्षणिक परिसर असलेल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, भोसले हायस्कुलच्या समोरील रस्त्यांवरून दररोज हजारो विद्यार्थी, महिला, मुली,ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.थोडाही पाऊस झाल्यानंतर नाल्यांचे पाणी रस्त्यावर येते आणि रस्त्याचे रूपांतर तलावात होते. प्रचंड घाण पाणी,त्यात निर्माण झालेले खड्डे आणि अधिकाऱ्यांकडून होणारी निव्वळ डोळेझाक. हे म्हणजे नागरिकांना जाणीवपूर्वक‌‍ छळण्याचे घेतलेले टेंडर तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो.खेड्यांची अवस्था‍ कितीतरी चांगली असून, जिह्याचे ठिकाण असलेल्या धाराशिव शहराला का छळले जातेय, याचे उत्तर कुणी लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी देत नाहीत.

पण, यावर बोलतील ते धाराशिवकर कसले..नागरिकांनो, आता निदान एवढं तरी करा, शहराला असे रस्ते देणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित करा आणि त्यांनी दाखवलेल्या कर्तबगारीबद्दल त्यांची या गुळगुळीत रस्त्यांवरून वरात काढा, कारण असे अधिकारी पुन्हा होणे नाही.

SendShareTweet
Previous Post

Big Breaking पालिका भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटी नेमली, अप्पर पोल‍िस अधीक्षक हसन गौहर यांच्यासह चार पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश

Next Post

Dharashiv Police एसपींना आव्हान; धाराशिवमध्ये भर रस्त्यात वायर बांधून लूट करण्याचा प्रयत्न, दुचाकीस्वार जखमी, जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

Related Posts

Breaking अनधिकृत खताचा 20 टन साठा जप्त; कृषी विभागाची मोठी कारवाई

May 16, 2025

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात मद्यधुंद पुजाऱ्याची दादागिरी, तहसीलदारांना शिवीगाळ,कार्यालयाची काच फोडली

May 14, 2025

बिबट्याची दहशत कायम; मसला येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; शेतकऱ्यावर उपचार सुरू

May 5, 2025

धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा, खासदार ओमराजे आणि आमदार राणा पाटील पुन्हा भिडले

May 1, 2025

जागरण गोंधळाच्या जेवणातून 90 ते 95 जणांना विषबाधा, रात्री उशिरापर्यंत धावपळ, रुग्णांवर उपचार सुरू

April 17, 2025

Breaking पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर भूममध्ये हल्ला,पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू

April 12, 2025
Next Post

Dharashiv Police एसपींना आव्हान; धाराशिवमध्ये भर रस्त्यात वायर बांधून लूट करण्याचा प्रयत्न, दुचाकीस्वार जखमी, जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

Manoj jarange Patil दोन डॉक्टर, दोन वकील,मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अन् राजकीय पक्षाचे नेते.. कोण असणार जरांगेंचे उमेदवार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group