प्रतिनिधी । शिराढोण
शिराढोण (ता.कळंब) येथे डाॅ.सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंतीनिमीत्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत व ग्रामशिक्षण समितीच्या वतीने येथील
आदर्श जिल्हा परीषद प्रशाला व के.एन. शाळेतील शिक्षकांचा यथोचित सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सरपंच लक्ष्मीताई म्हेत्रे, माजी सरपंच पद्माकर पाटील, नितीन आबा पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष नामदेव मकोडे, संजय शेळके, सुरेश महाजन, गणेश महाजन, जनार्धन महाजन, बेबीनंदा गोरे, राजपाल देशमुख, शाम पाटील, नवनाथ खोडसे, निलेश नाईकवाडे, मुन्ना यादव, अमर पाटील,
किरण नाईकवाडे, सचिन गायकवाड आदींची उपस्थिती होती.