• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, October 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 17, 2026
in राजकारण
0
खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर
0
SHARES
360
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी | तुळजापूर

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच तुळजापूर शहरासाठी तब्बल पाच कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाने आज (दि.१७) दोन स्वतंत्र शासन निर्णय जारी करून तुळजापूर शहरातील रस्ते, नाली, गटारे, पावसाच्या पाण्याचा निचरा तसेच खेळाच्या मैदानाच्या विकासासाठी एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाल्यामुळे ओमराजे यांनी समाजमाध्यमावर एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्याकडे निधीची मागणी करताच त्यांच्या वाढदिवशीच विकास निधीला मंजुरी मिळाल्याने या निर्णयाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ‘राज्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावयाच्या मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमा रस्ता अनुदान (अनिवार्य)’ या योजनेअंतर्गत तुळजापूर नगरपरिषदेस ४ कोटी ४५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून शहरातील विविध रस्त्यांचे मजबुतीकरण, नाल्या व गटारांची उभारणी, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि इतर आवश्यक नागरी विकासकामे करण्यात येणार आहेत.
शासन निर्णयानुसार संबंधित कामांना मंजूर निधीच्या मर्यादेत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्याची जबाबदारी नगरपरिषदेवर राहणार असून, या कामांची कार्यान्वयन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल. याशिवाय ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत तुळजापूर नगरपरिषदेला ५५ लाख रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून प्रभाग क्रमांक १० मधील सर्व्हे क्रमांक १८९ व ८३४ येथील तुळजाभवानी गृहनिर्माण संस्थेतील नगरपरिषदेचे खेळाचे मैदान विकसित करण्यात येणार आहे. दोन्ही शासन निर्णयांमुळे तुळजापूर शहराला एकूण पाच कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला असून, शहरातील प्रलंबित नागरी सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विकासकामांच्या पाठपुराव्यात अधिक सक्रिय भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे.
तुळजापूर शहरासाठी वाढदिवशीच मोठा निधी मंजूर झाल्याने त्यांच्या राजकीय प्रभावाची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, तुळजापूर शहर हे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. अशा परिस्थितीत त्याच मतदारसंघात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठा विकास निधी मंजूर करून आणल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. सत्तेचे पाठबळ आणि विकास निधीच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूरमध्ये आपले राजकीय बळ वाढविण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

SendShareTweet
Previous Post

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

Next Post

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

Related Posts

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

October 8, 2026
तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

October 7, 2026
ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

October 5, 2026
..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..?    पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

..अखेर उपनगराध्यक्ष ढोबळेंचा राजीनामा, आता कुणाला संधी..? पालिकेतील घडामोडींकडे शहराचे लक्ष, हे आहेत इच्छुक चेहरे

September 25, 2026
दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

दोरखंड लावून शिवसेनेच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले

September 23, 2026
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

September 22, 2026
Next Post
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

October 16, 2026
तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित;  मंदिर संस्थांनची कारवाई .

तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित; मंदिर संस्थांनची कारवाई .

October 16, 2026
शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

October 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group