आरंभ मराठी / धाराशिव
विधानसभा निवडणुकीच्या निकालांची अधिकृत आकडेवारी रविवारी सकाळी जाहीर झाली. या आकडेवारीनुसार तुळजापुरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय सर्वाधिक म्हणजे 36 हजार 879 मतांनी झाला असून, हे मताधिक्य जिल्ह्यातील सर्व चारही उमेदवारांच्या तुलनेत अधिक आहे.
शनिवारी रात्री प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील चार मतदारसंघातील उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य आमदार कैलास पाटील यांना असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे मताधिक्य वाढल्याने तेच जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना मिळालेली मतेही सर्वाधिक आहेत.
कैलास पाटील हे ३६ हजार ५६६ मतांच्या फरकाने निवडून आले. तर राणा जगजितसिंह पाटील हे ३६ हजार ८७९ मतांनी निवडून आले. म्हणजे कैलास पाटील यांच्यापेक्षा आमदार राणा पाटील यांचे मताधिक्य ३१३ मतांनी अधिक आहे. कैलास पाटील यांना १ लाख ३० हजार ५७३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अजित पिंगळे यांना ९४ हजार ७ मते मिळाली.
कैलास पाटील हे ३६ हजार ५६६ मतांनी निवडून आले. तुळजापूरमधून राणा पाटील यांना १ लाख ३१ हजार ८६३ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी धीरज पाटील यांना ९४ हजार ९८४ मते मिळाली. राणा पाटील हे ३६ हजार ८७९ मतांनी निवडून आले.