प्रतिनीधी । शिराढोण
मराठा समाजाला कुणबी मराठा ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे संघर्ष करत आहेत. त्यांना समर्थन म्हणून शिराढोण येथील ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारपासून छत्रपती संभाजी राजे चौकात लाक्षणीक उपोषण, साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात गावातील सर्व मराठा बांधवांचा सहभाग आहे. दरम्यान मराठा बांधवानी शिराढोण येथील पोलीस ठाण्यास याबाबत निवेदन दिले असून आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे. आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षातील नेत्यांना गावाबंदी करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.