मराठा आरक्षणासाठी उपोषण, तरुणाला ग्रामीण रुग्णालयात केले दाखल
प्रतिनिधी / वाशी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आंदोलक सौरभ सुकाळे यांची बुधवारी (दि. ३१) प्रकृती खालावली. त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना सलाईन लावून त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले.
मराठा आरक्षण मागणीसाठी व मनोज जारांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शहरात आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सौरभ सूकाळे, नेताजी नलवडे, बाळासाहेब कवडे , प्रशांत कवडे , कैलास गवारे,मच्छिंद्र येताळ , सुधीर गवारे हे आंदोलक उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सौरभ सूकाळे यांना चक्कर येऊन अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. यानंतर आमरण उपोषणाला बसलेल्या सर्वच आंदोलनकर्त्यांची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात आली.