• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 28, 2026
in क्राईम
0
खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात  कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त;   धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / कळंब

धुळे जिल्ह्यातील नरवाळ परिसरात गर्भवती महिलेचा निर्घृण खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या पुरुष व महिला आरोपीला कळंब पोलिसांनी ताब्यात घेतले. फारुख हजु शेख (वय २९, रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड, ह.मु. शेरे गल्ली, कळंब) आणि रोहिणी स्वप्निल जाधव ऊर्फ माधुरी महेंद्र मेघे (वय २६, रा. जामखेड कला केंद्र, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

या गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा मोबिलिओ कारही कळंब शहरातून जप्त करण्यात आली आहे. दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी नरवाळ, ता. जि. धुळे येथील चाळीसगाव-धुळे महामार्गालगत मुरमा टेकड्यांच्या परिसरातील वनक्षेत्रातील निर्जन ठिकाणी एका अनोळखी गर्भवती महिलेचा मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला होता.

त्यानंतर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यात आला. या प्रकरणी मोहाडीनगर पोलिस ठाणे, जि. धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान मृत महिला ही नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (वय ३१, रा. जामखेड कला केंद्र) असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात सरफराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन (वय ३८), आरीफ ऊर्फ खुज्या आसीफ शेख (वय ३१), लक्ष्मी बालाजी पवार (वय ३०) आणि स्वाती ऊर्फ आरती गणेश कुहाडे या चार आरोपींना यापूर्वीच धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

मात्र, फारुख शेख व रोहिणी जाधव हे दोघे फरार होते. दरम्यान, गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची मोबिलिओ कारही फरार आरोपींसह पोलिसांच्या शोधात होती. दि. २७ सप्टेंबर रोजी कळंब पोलिस निरीक्षक शकील शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत फरार महिला व पुरुष आरोपी कळंबहून केज रोडवर जेवणासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी केज रोडवरील सातबारा हॉटेलसमोर सापळा रचला. यावेळी दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांनी आरोपींची नावे व ओळख निश्चित करून त्यांचे छायाचित्र मोहाडीनगर पोलिसांना पाठविले. खात्री झाल्यानंतर दोन्ही आरोपींना कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना मोहाडीनगर, जि. धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याचदरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा मोबिलिओ कार कळंब शहरात बेवारस अवस्थेत आढळून आली.

कारची नंबर प्लेट काढलेली होती. तपासात तिचा क्रमांक एमएच ४३ एआर ४०७० असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन तीही मोहाडीनगर पोलिसांच्या स्वाधीन केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख, सहायक पोलिस निरीक्षक समाधान बजबळकर, पोलिस हवालदार महादेव मुंडे, पोलिस हवालदार अजीज शेख आणि महिला पोलिस अंमलदार सपना गिते यांच्या पथकाने केली.

SendShareTweet
Previous Post

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _ धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

Related Posts

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

September 25, 2026
मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

September 22, 2026
देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद                              १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

September 22, 2026
गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

September 19, 2026
बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

September 18, 2026

ताज्या घडामोडी

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात  कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त;   धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

September 28, 2026
शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का?          _  धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _ धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group