धाराशिव पंचायत समितीच्या आवारात कार्यक्रम
प्रतिनिधी / धाराशिव
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार तसेच जिल्हा प्रशासन, समाज कल्याण आणि खासदार ओमप्रकाश राजानिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या विशेष सहकार्याने संपूर्ण मतदारसंघात दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी आणि गरजूंना साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. रविवारी धाराशिव पंचायत समितीच्या आवारात कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी 400 गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्न करणार आहे.
ए.डी.आय.पी योजनेअंतर्गत मोफत तर कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये या शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. धाराशिव पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये पात्र दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्याचे वाटप खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील, सह संपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले,मागील 40 वर्षांपासून दिव्यांग बांधवांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दिव्यांग बांधवांसाठी केद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या योजनेतून साहित्याचे वाटप करताना मला दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी करता आले, याचे समाधान होत आहे तसेच जिल्हाभरातील पात्र दिव्यांग बांधवांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आवश्यक असणारी विविध उपकरणे देऊन त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये व स्वावलंबी तसेच दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करता आला. माझ्यासह आमदार कैलास पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने केद्र सरकार सामाजिक न्याय व अधिकार्यता मंत्रालय यांच्या माध्यमातून जिल्हाभरातील सर्व दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचून त्यांना सहकार्य करता आले व यापुढे दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे जे शक्य आहे ते सर्वतोपरी करण्याचा आपला मानस आहे.
एडीआयपी योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटपासाठी धाराशिव पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये 428 पात्र लाभार्थीपैकी 400 दिव्यांगांना विविध साहित्य वाटप खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना सायकल, कुबडी जोडी, श्रवण यंत्र, सी.पी.चेअर, अंधकाटी, स्मार्टफोन आदी साहित्य वाटप करण्यात आले.
या मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी, युवासेना विभागीय सचिव तथा जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, माजी उपसभापती पं.स शाम जाधव, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, प्रहार जिल्हाध्यक्ष मयूर काकडे,नगरसेवक गणेश खोचरे,युवासेनेचे दिनेश बंडगर, तसेच विशनु वैरागड सत्यम दिव्याग संस्था परभणी तसेच अलीम्कोचे डॉ.सुजन भालेराव, डॉ.गौरीश सोलंके डॉ.निहाश कुमार कानपुर शाम यादव कानपुर किरण पावरा अभिजित देशमुख,प्रा.रामकृष्ण मते, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, गटविकास अधिकारी ढवळशंख,कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण, रवी कोरे, पांडुरंग माने, महेश लिमये, राकेश सूर्यवंशी, सत्यजित पडवळ, अजित बाकले आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.