• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, October 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 15, 2026
in सामाजिक
0
शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी /कळंब

शहराच्या अस्मितेचे प्रतीक आणि तब्बल २७ वर्षे सामाजिक, राजकीय चळवळींचा साक्षीदार राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बुधवारी (दि. १४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विधिवत पूजन करून तात्पुरता उतरविण्यात आला. पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मात्र, गेली २७ वर्षे शहराची शान असलेला पुतळा नजरेआड होताच शिवाजी महाराज चौक काहीसा सुना आणि उदास भासू लागला.

२६ एप्रिल १९९८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख नेते स्व. नरसिंगअण्णा जाधव यांनी पुतळा उभारणीसाठी विशेष पाठपुरावा केला होता. कोल्हापूर येथील स्व.बी.आर.खेडकर यांनी अडीच टन वजनाचा ब्राँझ चा पुतळा साकारला होता.त्यावेळी बाबुराव काजळे नगराध्यक्ष होते. तेव्हापासून हा पुतळा कळंबच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग बनला.

अनेक आंदोलने, मोर्चे आणि सामाजिक उपक्रमांची सुरुवात याच पुतळ्याला अभिवादन करून झाली. भव्य शिवजयंती उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या कळंब शहरात हा देखणा अश्वारूढ पुतळा आकर्षणाचे केंद्र ठरला होता.

पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, व्यापारी संघ, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज प्रतिष्ठान, शिवाई प्रतिष्ठान, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यांच्यासह शिवप्रेमींनी सातत्याने निवेदने देत आंदोलने केली.

अखेर या मागणीला यश आले असून शासनाकडून भरीव निधी मंजूर झाला आहे.या नगरपालिकेनेही अतिरिक्त पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. सदरील पुतळ्याच्या रंगकाम व इतर सुशोभीकरणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आला आहे.

पुतळा उतरविताना नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे, बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे, शिवसेना नेते अजित पिंगळे, उपनगराध्यक्ष लखन गायकवाड, नगरसेवक संजय मुंदडा, अतुल कवडे, हर्षद अंबुरे, भूषण करंजकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, भाजपचे माणिक बोंदर, बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश धस आदी उपस्थित होते.
_

शिवरायांच्या पुनरागमनाची प्रतीक्षा!

गेली २७ वर्षे शिवजयंती उत्सव, सामाजिक आंदोलने आणि असंख्य ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असलेला हा पुतळा तात्पुरता हटविल्याने चौकाचे रूपच पालटले. शिवप्रेमींच्या प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर आता उंच चबुतरा, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह शिवरायांचा पुतळा पुन्हा दिमाखात विराजमान होणार आहे. त्यामुळे कळंबकरांना आता शिवरायांच्या पुनरागमनाची प्रतीक्षा लागली आहे.

SendShareTweet
Previous Post

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार

Related Posts

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन  गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

October 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

July 23, 2026
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026

Manoj jarange मनोज जरांगे पाटील रविवारी धाराशिमध्ये; भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

November 29, 2024

धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर !

August 13, 2024

ताज्या घडामोडी

शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

October 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार

October 14, 2026
तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group