• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, July 16, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking news ..अखेर जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एक करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 29, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
4.8k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी/ मुंबई

अनेक वर्षापासून असलेली शेतकऱ्यांची मागणी सरकारने मान्य करत वर्ग दोन असलेली जमीन वर्ग एक करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामूळे वर्ग एकच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूलंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. ही जमीन आता सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास देखील मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमिनी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने वाटप करण्यात आलेल्या होत्या. ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी वर्ग-१  च्या जमिनी खंडाने दिलेल्या होत्या, त्या परत मिळताना त्यांना वर्ग-२ म्हणून मिळाल्याने या जमिनींचा धारणा प्रकार वर्ग-१ करुन मिळण्याबाबत खंडकरी शेतकऱ्यांची दीर्घ कालावधीपासूनची मागणी होती. या खंडकरी शेतकऱ्यांच्या दीर्घ कालावधीच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करुन मंत्रिमंडळ बैठकीत मांडलेल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग करण्याच्या या सुधारणेमुळे ६ जिल्ह्यांतील, १० तालुक्यामध्ये वाटप करण्यात आलेल्या ३८ हजार ३६१ एकर क्षेत्राचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-१ असा होणार असून सुमारे २ हजार ६०० खंडकरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. या सुधारणेमुळे दीर्घ कालावधीपासूनची खंडकरी शेतकऱ्यांची मागणी पूर्णत्वास जाऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच शेती महामंडळाची जमीन मिळण्याबाबत वेगवगळ्या सार्वजनिक प्रयोजनांसाठी ग्रामपंचायतींकडून मागणी करण्यात येत होती. परंतु सिलिंग कायद्यातील तरतुदीनुसार नगरपालिका हद्दीपासून ५ कि.मी. अंतराबाहेरील जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी देता येत नसल्याने या जमिनी ग्रामपंचायतींना देण्यास कायदेशीर अडचण निर्माण झालेली होती. शासकीय घरकूल योजना, गावठाण विस्तार योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजना या कारणांसाठीची ग्रामपंचायतींची गरज विचारात घेऊन सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या सुधारणेनुसार आता ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करुन देता येईल.

वेगवेगळ्या प्रयोजनासाठी दिलेल्या जमिनींचे काय होणार?

राज्य शासनाने काही भागातील शेती जमिनीवरील वर्ग दोन काढून वर्ग एक करण्यास मंजुरी दिली असली तरी इनाम, वतन, कुळ आदी प्रवर्गातील जमिनींवर करण्यात आलेला वर्ग दोनचा उल्लेख कधी काढला जाणार, असा प्रश्न विचारला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाने दीड वर्षांपूर्वी हजारो एकर जमिनींच्या सातबारावर वर्ग दोन अशी नोंद केली आहे. त्यामुळे जमिनीचे तसेच घराच्या जागेचे, बांधलेल्या घरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार टप्पे झाले आहेत. धाराशिवसारख्या शहरातील अर्थव्यवस्थेवर त्यामुळे मोठा परिणाम झाला आहे.

SendShareTweet
Previous Post

आता पोलीस पाटील आंदोलनासाठी उतरणार आझाद मैदानात; वाशीमधून २५ पोलीस पाटलांचा सहभाग

Next Post

श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालयात विधी साक्षरता शिबिर; मान्यवरांकडून कायदेविषयक मार्गदर्शन

Related Posts

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

June 8, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

June 8, 2025

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

May 22, 2025

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड

May 13, 2025
Next Post

श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालयात विधी साक्षरता शिबिर; मान्यवरांकडून कायदेविषयक मार्गदर्शन

सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सला एनएबीएच मानांकन, अद्ययावत उपचार पद्धती, प्रशिक्षित डॉक्टर, सुविधांमुळे दिल्लीच्या संस्थेकडून मानांकन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जमावाची मारहाण

July 15, 2025

आरंभ मराठीच्या वृत्ताची दखल, जिजाऊ चौकातील पोलिस चौकीच्या मुद्द्यावर लक्षवेधी

July 15, 2025

गोंधळ राडा; प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संघटना आक्रमक

July 14, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group