प्रतिनिधी / शिराढोण
शिराढोण (ता.कळंब) येथील गेल्या 20 वर्षापासून ग्रामीण संगणक साक्षर कार्यात अग्रेसर असलेल्या गायत्री कॉम्प्युटर्स या संगणक प्रशिक्षण संस्थेत उन्हाळी बॅचमध्ये संगणक अभ्यासक्रमासाठी
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देवून निरोप देण्यात आला.हा कार्यक्रम रविवारी (दि.2) घेण्यात आला. इयत्ता 10 वी शालेय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उन्हाळी सुट्टीत ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने एमएससीआयटी या संगणक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. शिराढोण येथील गायत्री कॉम्प्यूटर्स या संस्थेत शिराढोण व परिसरातील 140 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. या संगणक अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेच्या पूर्वी या विद्यार्थ्यांना या संस्थेचे संचालक अमोलसिंह चंदेल यांनी करिअरबद्दल मार्गदर्शन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण तसेच संगणक या बरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर द्यावा असे मत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संगणक शिक्षिका आशा भोरे, मिनाक्षी डावकरे, महेश
पानढवळे, अवधुत पाटील, रमेश खडबडे यांनी पुढाकार घेतला.