योगीराज पांचाळ / दहीफळ
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील किरण भातलवंडे ४ सप्टेंबरपासुन ग्रामदैवत खंडोबा मंदिरासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.उपोषणाला बसुन चार दिवस झाले आहेत.मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे उपोषण सुरू आहे.त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील गावातून तरुण येत आहेत तसेच नेते मंडळी, विविध पक्षांचे नेते भेट घेत आहेत. प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रदिप सोळुंके, राष्ट्रवादीचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दिला तसेच यावेळी प्रदिप सोळुंके यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की जालना जिल्ह्यातील सराटे गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गावागावात तरूण युवक पाठिंबा देण्यासाठी एकत्र येऊन उपोषण करत आहेत.
लाखोंचे मोर्चे निघाले तरी सरकारला घाम फुटला नाही.खोटे आश्वासन दिले न टिकणारे आरक्षण जाहीर केले.मराठ्यांचा अंत पाहू नका ते शांत आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने आज गावागावांतील तरुण जागा होत आहे.पाठिंबा देण्यासाठी उपोषण करत आहेत.उपोषण शांत मार्गाने होत आहे. परंतु काही युवक आरक्षण मिळवण्यासाठी आत्महत्या करत आहेत.मराठा तरुणांनो मरू नका, लढत रहा, आपली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे.लढाई जिंकणार याची खात्री आहे.म्हणुन टोकाचे पाऊल उचलू नका. महाराष्ट्र सरकारने हैदराबाद निजामकालीन कागदपत्रांचे पुरावे मागितले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी निजामकालीन कागदपत्रासंदर्भात केसीआर सर्वोतपरी सहकार्य करणार आहेत.मी स्वतः त्यांना बोललो आहे. आतापर्यंत संयमाने घेतले आहे.सरकारने ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे ही नम्र विनंती आहे.नाही तर मराठा समाजाचा संयम सुटेल.असे सोळुंके म्हणाले.
सरकारने लवकर आरक्षण जाहीर करावे डॉ.प्रतापसिंह पाटील.
लाखोंचे मोर्चे निघाले तरी मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही.मराठा मुलांना आरक्षण नसल्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.गरिब कुटूंबातील मुलं शिकू शकत नाही.सरकारी महाविद्यालय कमी आहेत.पैसे भरून खाजगी महाविद्यालयात ते शिक्षण घेऊ शकत नाहीत.नोकरी नाही म्हणून अनेक तरुण सुशिक्षित बेकार जीवन जगत आहेत.त्यांच्या भवितव्यासाठी सरकारने ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे.आज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गावोगाव तरुण एकत्र येत आहे.लवकर आरक्षण जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हे तरुण देत आहेत.सरकारने लवकर निर्णय घ्यावा,असे डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी म्हटले आहे.