• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, February 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अजितदादांच्या मृत्यूमुळे धाराशिव जिल्हा शोकसागरात, व्यवहार ठप्प, सामान्य नागरिकांनाही धक्का

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 28, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
446
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांची सासरवाडी असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या मृत्यूचा सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला असून धाराशिव जिल्ह्याच्या वातावरणात देखील दुःखाची छाया पसरली आहे. अजित दादांची सासुरवाडी असणाऱ्या तेर गावामध्ये सार्वजनिक व्यवहार ठप्प झाले असून, आज दुकानेही बंद आहेत. तेरमधील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असून, सामान्य नागरिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

अजितदादा पवार हे धाराशिव जिल्ह्यातील पाटील घराण्याचे जावई होते. आमदार राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विवाह सोहळ्याला अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांनी उपस्थिती लावत घरच्या सोहळ्याप्रमाणे ते या लग्नाच्या सोहळ्यात रमले होते. अजितदादा यांच्या दुर्दैव मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला असून आमदार राणा पाटील, अर्चनाताई पाटील आणि चिरंजीव मल्हार पाटील व मेघ पाटील यांनी समाज माध्यमावर पूर्ण ब्लँक असणारे स्टेटस ठेवले असून भावना व्यक्त करण्यास शब्द नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

धाराशिव शहरात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी अजित दादा पवार यांच्यावर श्रद्धांजली वाहण्यात येत असून त्यांची सासुरवाडी असणाऱ्या तेर या गावी गावकऱ्यांच्या वतीने जुन्या बसस्थानकावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे जेष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा पवार यांच्याशी अजित पवार यांचा विवाह झाला होता. आमदार राणा पाटील यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी वैयक्तिक पातळीवर पाटील परिवाराने आणि पवार परिवाराने एकमेकांशी कौटुंबिक स्नेह कायम ठेवला होता.

आमदार राणा पाटील यांचे अजित दादांसोबत विशेष नाते होते. हाच स्नेह पुढील पिढीने देखील जपला असून, आमदार राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील आणि मेघा पाटील यांनीही पुढे अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबतचे कनिष्ठ कौटुंबिक संबंध जपले आहेत. अजितदादा यांच्या निधनाचे दुःख ज्याप्रमाणे पवार कुटुंबाला आहेत तसेच दुःख पाटील कुटुंबीयांना देखील झाले आहे.

धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनीही अजितदादा पवार यांच्या निधनावर समाज माध्यमातून दुःख व्यक्त केले असून आज महायुतीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून अजितदादा यांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#death#Ajitdada#district#business#stopped#shocked#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

‘असा’ अपघात झाला आणि पाच मिनिटात होत्याचे नव्हते झाले

Next Post

‘या’ कारणामुळे अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल व्यक्त केला जातोय संशय

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

'या' कारणामुळे अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल व्यक्त केला जातोय संशय

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनावर भावनिक पत्र

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group