• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, February 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

‘असा’ अपघात झाला आणि पाच मिनिटात होत्याचे नव्हते झाले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 28, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.7k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली. सुरुवातीला अजित पवार यांच्या संदर्भातील ज्या बातम्या येत होत्या त्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. मात्र, हा अपघात अचानकपणे आणि विचित्र पद्धतीने झाल्यामुळे यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अंतिम यादी काल प्रसिद्ध झाल्यानंतर आजपासून उमेदवारांचा अधिकृतपणे प्रचार सुरू झाला आहे. याच प्रचारासाठी बारामती तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटामध्ये अजित पवार यांच्या जाहीर सभांचे आज आयोजन करण्यात आले होते.

काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर आज सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी VT SSK Jet 45XR या खाजगी विमानाने अजित पवार बारामतीच्या दिशेने निघाले होते. बारामती विमानतळाची धावपट्टी अगदी पाच मिनिटांवर आली असताना 8 वाजून 45 मिनिटांनी विमानाने बारामती विमानतळावर लँडिंग करण्यास सुरुवात केली. परंतु, विमानाने दोन गिरट्या हवेतच मारल्यानंतर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला.

त्यामुळे हे विमान वेगाने खाली कोसळले. ज्या वेळेला विमान दोन वेळेला हवेतच घिरट्या मारत होते, त्यावेळेला विमानाचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा आणि खूप मोठा येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विमान अगदी काही क्षणात खाली कोसळले आणि कोसळताच विमानाचा मोठा स्फोट होऊन विमानाने मोठा पेट घेतला.

विमानाने पेट घेतल्यानंतर आजूबाजूच्या शेतात असणारे नागरिक दुर्घटनास्थळाकडे धावले. मात्र, तिथे आग इतकी मोठी होती की तिथे तात्काळ बचाव कार्य करणे शक्य झाले नाही. स्थानिकांनी तात्काळ पोलीस स्टेशन आणि विमानतळाला ही बातमी कळवली. प्रशासनाची मदत येईपर्यंत आणि अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत विमानात असणारे पाचही व्यक्ती मोठ्या प्रमाणात भाजले होते.

स्थानिकांनी गॉगल आणि घड्याळावरून अजित पवार यांचा भाजलेला मृतदेह ओळखला. या अपघातात उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश आहे. या पाचही व्यक्तींचा विमान अपघातामध्ये दुर्दैव मृत्यू झाला आहे.

जे खाजगी विमान अजित दादा घेऊन गेले होते, अशा विमानाचा हा दुसरा अपघात आहे. सध्या DGCA कडून विमान अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. अजित दादांच्या या अनाकलनीय मृत्यूमुळे राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्याचे जावई असणारे अजित पवार यांचा धाराशिव जिल्ह्यासोबत नेहमीच स्नेह राहिलेला आहे.

अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींकडून शोक व्यक्त केला जात आहे. अजितदादा यांच्या मृत्यूमुळे राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत. राजकारणातला दादा माणूस अकाली निघून गेल्यामुळे सामान्य नागरिकांपासून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. अजितदादा यांच्या पार्थिवावर बारामती तालुकातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सध्या त्याबद्दलची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी काही वेळात त्यांच्या कुटुंबीयांकडून या संदर्भात माहिती दिली जाईल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकारी हे बारामतीच्या दिशेने निघाले आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे पवार कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार यांना अश्रू अनावर होत असून सध्या सर्व पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. धाराशिव जिल्ह्यातूनही काही नागरिक बारामतीच्या दिशेने निघाले आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

महायुतीच्या प्रचाराचा नारळ उद्या फुटणार; मुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री शिंदे यांची सांजा येथे संयुक्त सभा

Next Post

अजितदादांच्या मृत्यूमुळे धाराशिव जिल्हा शोकसागरात, व्यवहार ठप्प, सामान्य नागरिकांनाही धक्का

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

अजितदादांच्या मृत्यूमुळे धाराशिव जिल्हा शोकसागरात, व्यवहार ठप्प, सामान्य नागरिकांनाही धक्का

'या' कारणामुळे अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल व्यक्त केला जातोय संशय

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group