• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, May 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

उमरग्यात सभापतीपदाची रंगत वाढली; आकांक्षा चौगुले यांना संधी मिळणार का?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 10, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
791
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

नसरोद्दीन फकीर / आरंभ मराठी

उमरगा –

नऊ वर्षांनंतर झालेल्या उमरगा पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना (शिंदे), भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या महायुतीने जोरदार मुसंडी मारत १८ पैकी तब्बल १३ जागांवर विजय मिळवला असून पंचायत समितीवर महायुतीचे स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

यंदा उमरगा पंचायत समितीतील गणांचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून, त्यामध्ये भुसणी, केसरजवळगा आणि कवठा या गणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सभापतीपदाची निवड अधिकच महत्त्वाची ठरली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पक्षीय बलाबल काय सांगते?

निवडणूक निकालानुसार
भाजप – ७ जागा
शिवसेना (शिंदे) – ५ जागा
कॉंग्रेस – ३ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १ जागा
शिवसेना (उबाठा) – १ जागा
अपक्ष – १ जागा
असे एकूण १८ सदस्य निवडून आले आहेत. संख्याबळ पाहता महायुतीकडे सभापतीपदाची चावी असून, पहिल्या अडीच वर्षांसाठी भाजपचे कैलास चिंतामणराव शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र, राजकीय वर्तुळात आणखी एक नाव ठळकपणे पुढे येत आहे—केसरजवळगा गणातून विजयी झालेल्या कु. आकांक्षा ज्ञानराज चौगुले. त्या शिवसेना (शिंदे) पक्षाचे उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या असून, नव्या नेतृत्वाचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
महायुतीतील अंतर्गत वाटाघाटींमध्ये शिवसेनेला संधी देण्याचा निर्णय झाला, तर सभापतीपदासाठी आकांक्षा चौगुले यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उमरगा तालुक्यातील राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उमरगा पंचायत समितीच्या १८ गणांतून विजयी झालेले उमेदवार असेआहेत –

कवठा : सौ. रुक्मिणी देविदास कांबळे (कॉंग्रेस)
नाईचाकूर : सुगलाबाई वामन मदणे (कॉंग्रेस)
बलसुर : अर्चना साहेबराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अप)
माडज : स्वाती मन्मथ सोमशंकर (शिवसेना शिंदे)
कुन्हाळी : रविंद्र शंकर हंगरगे (कॉंग्रेस)
तलमोड : दगडू कालीदास मोरे (भाजप)
तुरोरी : तुकाराम मदनराव जाधव (शिवसेना)
मुळज : रेखा विक्रम इंगळे (अपक्ष)
गुंजोटी : सौ. स्नेहा संतोष जाधव (शिवसेना)
जकेकुर : हरिदास भानुदास जाधव (शिवसेना उबाठा)
दाळींब : अमर विद्याधर वाले (भाजप)
भुसणी : कैलास चिंतामणराव शिंदे (भाजप)
येणेगुर : सौ. विजयालक्ष्मी श्रीकांत पाटील (भाजप)
तुगाव : सौ. रेखा संजय मुळे (भाजप)
आलूर : राजकुमार शंकरराव माने (भाजप)
केसरजवळगा : कु. आकांक्षा ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
कदेर : सौ. महानंदा हणमंत कलबुर्गे (शिवसेना)
डिग्गी : अनिल दत्तोपंत माने (भाजप)

कोण होणार उमरग्याचा सभापती?

एकीकडे भाजपचे संख्याबळ, तर दुसरीकडे शिवसेनेची राजकीय वजनदार दावेदारी या संघर्षातून उमरगा पंचायत समितीचा सभापती कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या वाटाघाटी आणि निर्णयावर तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी लेकीसाठी संपूर्ण ताकद लावली असून, महायुतीच्या वाटाघाटी मध्ये त्याला कितपत यश मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#chairmanship#Umarga#AkankshaChowgule#chance#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

तेर येथे सक्षणा सलगर तिसऱ्या स्थानी; अर्चनाताई पाटील यांचा ‘इतक्या’ मतांनी दणदणीत विजय

Next Post

ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्यास स्थगिती ; निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका

Related Posts

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

May 10, 2026

BLO चे काम आटोपून परतणाऱ्या शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; धोकादायक रस्त्याने घेतला आणखी एक बळी

May 9, 2026
Next Post

ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्यास स्थगिती ; निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

ताज्या घडामोडी

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group