• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, October 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना; २१० कोटींच्या निधीस मंजूरी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 12, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
25
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी /  मुंबई

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन करण्यासाठी व त्यास आवश्यक असलेला निधी २०२३ -२४ या आर्थिक वर्षासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे २१०.०१ कोटी रुपये मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व महानगरपालिका रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जाते. राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत बनविण्यासाठी सातत्यपूर्ण आरोग्य, गुणवत्तापूर्ण सेवा तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करुन राज्याचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याचे शासनाचे धोरण आहे. अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागात व झोपडपट्टी क्षेत्रात दवाखाने स्थापन करुन आरोग्य सेवा देण्याचे प्रयोग सुरु करण्यात आलेले आहेत. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने २०२२-२३ मध्ये “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्राची स्थापना केली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यामध्ये एकूण ७०० ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर आरोग्य केंद्रासाठी औषधे, चाचण्या, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ५०० चौरस फूट जागा, फर्निचर, स्वच्छता व सुरक्षा उपलब्ध करुन देणे, वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, सफाई कर्मचारी व अटेंडंट एवढा कर्मचारी वर्ग, ३० प्रकारच्या चाचण्या, १०५ प्रकारच्या औषधी, ६६ प्रकारची वैद्यकीय उपकरणे, फर्निचर व वैद्यकीय साहित्य सामग्री, सॉप्टवेअर, हार्डवेअर उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आपला दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना नवीन असल्यामुळे त्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना ५ वर्षासाठी कार्यरत राहणार असल्याने या योजनेसाठी द्यावयाची प्रशासकीय मान्यता ५ वर्षासाठी देण्यात आली आहे.

१५ हजार लोकसंख्येमागे दवाखाना

आपला दवाखाना योजनेचे कार्यक्षेत्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटकमंडळे इ. ठिकाणी साधारणत: १५००० लोकसंख्यामागे एक याप्रमाणे दवाखान्यांची निर्मिती करण्यात येईल. आपला दवाखाना” आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची निवड १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निधीच्या विनियोगाबाबत नियोजन व संनियंत्रण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडून करणार आहे.

आपला दवाखाना योजनेत १०५ प्रकारच्या औषधी    

आरोग्य सेवा लाभार्थ्यांना मोफत पुरविण्यात येईल. जिल्हा आरोग्य सोसायटीने भाड्याने जागा घ्यावी, त्यामध्ये आवश्यक बदल करावेत, सोयीसुविधा पुरवाव्यात, यंत्रसामुग्री, औषधे व डॉक्टरसहीत इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा.सदर ५०० चौरस फूट भाड्याची जागा “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” साठी उपलब्ध करावी. दवाखान्यामध्ये औषधी वितरण मोफत पुरविण्यात येईल. प्रत्येक दवाखान्यात एकूण ३० प्रकारच्या चाचण्या करणे आवश्यक राहील. आपला दवाखान्यामध्ये एकूण १०५ प्रकारच्या औषधी असतील.

SendShareTweet
Previous Post

वाशीमध्ये वयोवृद्धाला बेदम मारहाण

Next Post

600 रुपये दराने एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार !

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

600 रुपये दराने एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार !

घराच्या गच्चीवर फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा; महाबळेश्वरपेक्षा ८ अंशाने तापमान अधिक असूनही प्रयोग यशस्वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार

October 14, 2026
तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

October 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group