• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, October 10, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 10, 2026
in Drought
0
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

पावसाने मोठी ओढ दिल्याने धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, खरीप पिकांसह पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ मूल्यांकन पथक आज, शनिवारी (दि.१०) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात धाराशिव, वाशी आणि भूम तालुक्यांतील करजखेडा, आळणी, येडशी, खानापूर, वाशी आणि हाडोंग्री या गावांना भेटी देऊन पीक नुकसानीची तीव्रता, पाणीटंचाई आणि पशुधनासाठी चाऱ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्रीय पथकाच्या या पाहणीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

यंदा जिल्ह्यात पावसाची सुमारे ४० टक्के तूट नोंदविण्यात आली असून, पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह इतर पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेक भागांत पिके हातची गेली आहेत. तलाव कोरडे पडल्याने तसेच विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांसाठी चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन जाणून घेण्यासाठी या पाहणी दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
केंद्रीय दुष्काळ मूल्यांकन पथक दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे दाखल झाले. सुरुवातीच्या नियोजनानुसार या पथकाकडून सोलापूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात येणार होती. या नियोजित दौऱ्यात धाराशिव जिल्ह्याचा समावेश नव्हता.

मात्र, त्यानंतर अचानक धाराशिव जिल्ह्याचाही पाहणी दौरा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार पथक आज जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन दुष्काळाची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणार आहे. या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पथकाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर जिल्हा प्रशासनाकडून पीक नुकसानीची आकडेवारी सादर केली जाणार असून, दुष्काळी परिस्थितीबाबत तयार करण्यात आलेला अहवालही पथकासमोर ठेवला जाणार आहे. प्रस्तावित दौऱ्यानुसार, केंद्रीय पथक सकाळी आठ वाजता धाराशिव येथून करजखेडा गावाकडे रवाना होणार आहे. तेथे ऊस आणि सोयाबीन पिकांची तसेच कोरड्या पडलेल्या तलावांची पाहणी केली जाईल. सकाळी नऊ वाजता पथक करजखेडा येथून आळणी येथे रवाना होऊन ऊस पिकाच्या स्थितीचा आढावा घेणार आहे.
सकाळी साडेनऊ वाजता आळणी येथून येडशी येथे भेट देण्यात येणार आहे. येथे कोरड्या पडलेल्या विहिरी, सोयाबीन पीक आणि तलावांच्या स्थितीची पाहणी केली जाईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता पथक खानापूर येथे पोहोचेल. खानापूर येथे द्राक्षबागांची स्थिती आणि पशुधनासाठी उपलब्ध असलेल्या चाऱ्याची पाहणी करण्यात येणार आहे.

सकाळी अकरा वाजता पथक खानापूर येथून वाशी येथे जाऊन सोयाबीन पिकांचे नुकसान आणि कोरड्या पडलेल्या तलावांची स्थिती तपासणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता वाशी येथून भूम तालुक्यातील हाडोंग्री येथे भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली जाणार आहे. दुपारी बाराच्या सुमारास पथक भूम येथे पोहोचेल. भूम येथील विश्रामगृहावर भोजनानंतर दुपारी एक वाजता पथक छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार असल्याचे प्रस्तावित वेळापत्रकात नमूद आहे. जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, घटलेली पाणीपातळी आणि पशुधनाच्या चारा-पाण्याची टंचाई या समस्यांमुळे ग्रामीण भागातील जनजीवनावरही परिणाम होत आहे.

या परिस्थितीत केंद्रीय पथकाकडून होणारी प्रत्यक्ष पाहणी जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
पाहणीदरम्यान पथकाला पीक नुकसानीचे प्रत्यक्ष चित्र, कोरडे पडलेले जलस्रोत आणि चारा उपलब्धतेची स्थिती दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीची आकडेवारी आणि दुष्काळासंदर्भातील अहवाल सादर केला जाईल. या पाहणीच्या निष्कर्षांच्या आधारे केंद्राकडून मदत आणि पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

SendShareTweet
Previous Post

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

Related Posts

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

October 1, 2026
शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का?          _  धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _ धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

September 28, 2026
‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

September 26, 2026
…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

September 26, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

September 22, 2026
आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

September 19, 2026

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

October 10, 2026
कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

October 8, 2026
नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन  गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

October 8, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group