• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, October 1, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 1, 2026
in क्राईम
0
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण;  गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी
0
SHARES
1.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरातील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पडसाद गुरुवारी महाविद्यालयात उमटले. या वादानंतर विद्यार्थिनीने तिच्या पतीसह नातेवाईकांना महाविद्यालयात बोलावून घेतल्याचा आरोप असून, त्यानंतर संबंधित नातेवाईकांनी एका विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या मारहाणीचे व्हिडिओ देखील समाजमाध्यमावर व्हायरल झाले.

या घटनेमुळे महाविद्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचा आणि विद्यार्थ्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर विद्यार्थिनीने तिच्या पतीसह काही नातेवाईकांना महाविद्यालयात बोलावून घेतले. महाविद्यालयात आल्यानंतर संबंधित व्यक्तींनी त्या विद्यार्थ्याला वर्गातच मारहाण केली. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्याला जिन्यावरून ओढत आणून तीन ते चार जणांनी मारहाण केल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकाराची माहिती मिळताच महाविद्यालयाचे प्राचार्य कायला कृष्णमूर्ती यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे लिखित पत्र आनंदनगर पोलीस ठाण्यात देण्यात आले.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सकाळी साडेआठ वाजल्यापासून सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात ठिय्या मांडून बसले. संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत महाविद्यालयाचे कामकाज सुरू करू दिले जाणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे गुरुवारी दिवसभर महाविद्यालयाचे नियमित कामकाज ठप्प राहिले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्राचार्यांनी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना महाविद्यालयात बोलावून घेतले. यावेळी विद्यार्थ्याला मारहाण होत असल्याचे व्हिडिओ पोलिसांना दाखवण्यात आले. पोलिसांनी संबंधित व्हिडिओची पाहणी करून प्रकरणात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसला तरी महाविद्यालय प्रशासनाकडून मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील पत्र आनंदनगर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महाविद्यालय परिसरात बाहेरील व्यक्तींना प्रवेश कसा मिळाला आणि विद्यार्थ्याला वर्गात मारहाण होईपर्यंत परिस्थिती नियंत्रणात का आणता आली नाही, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

SendShareTweet
Previous Post

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

Next Post

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

September 25, 2026
मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

September 22, 2026
देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद                              १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

September 22, 2026
Next Post
विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

ताज्या घडामोडी

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

October 1, 2026
विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 1, 2026
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण;  गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

October 1, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group