• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 12, 2026
in महाराष्ट्र
0
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे २९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. राज्य सरकारकडून अद्याप आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने अखेर जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत.
येत्या १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आंतरवली सराटी येथून लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी १२ सप्टेंबरपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीची दखल घेतली नाही, तर मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने मराठा बांधव आंतरवली सराटी येथे दाखल झाले. यावेळी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. जरांगे पाटील यांनी सांगितले की, १४ सप्टेंबर रोजी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आंतरवली सराटी येथून मुंबईकडे कूच करण्यात येईल. या आंदोलनासाठी पाच दिवसांचे नियोजन करण्यात आले असून, मार्गातील विविध ठिकाणी आंदोलकांचे मुक्काम असतील.

*असा असेल मुंबईकडे जाण्याचा मार्ग*

१५ सप्टेंबर : आंतरवली सराटी येथून सकाळी १० वाजता प्रस्थान. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे.

१६ सप्टेंबर : दुसरा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे.

१७ सप्टेंबर : तिसरा मुक्काम पुणे शहरातील हडपसर येथे.

१८ सप्टेंबर : चौथा आणि शेवटचा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली किंवा कोपरखैरणे येथे.

१९ सप्टेंबरपासून : मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

*‘लाखोंच्या संख्येने मुंबईला या’*

मराठा समाजातील जास्तीत जास्त बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. गरीब मराठ्यांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरावे, लाखोंच्या संख्येने वाहने घेऊन मुंबईकडे यावे, असे आवाहन त्यांनी केले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच एका आंदोलकाला जरी मारहाण झाली, तरी त्याचे तीव्र पडसाद उमटतील आणि संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला.

*महिलांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन*

या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन महिलांनी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विदर्भ आणि खानदेशातील मराठा समाजानेही आरक्षणाच्या या लढ्याला साथ द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ तसेच जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या लढाईतील हा निर्णायक टप्पा असून, आता मागे हटण्याचा प्रश्नच नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सर्व समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन करत जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुंबई आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

SendShareTweet
Previous Post

Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

Related Posts

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025

धाराशिवच्या माजी खासदाराची 70 लाखांची फसवणूक;पोलिसांकडून तपास सुरू

September 25, 2024

Martha Reservation कुणबी संदर्भात धाराशिवच्या समितीला हैद्राबादमधून मिळाले महत्वाचे दस्तावेज, तत्काळ निर्णय घ्या

September 22, 2024

ताज्या घडामोडी

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

September 12, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group