• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, July 8, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 11, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.7k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय चर्चांना मोठे उधाण आले असून, खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वेगाने पसरत आहेत. या चर्चांचे खंडन स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर तसेच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे केले असले, तरीही सोशल मीडियावर या अफवा थांबण्याचे नाव घेत नाहीत.

यातच आमदार कैलास पाटील यांच्याबाबतही अशाच प्रकारच्या पक्षांतराच्या चर्चांना जोर मिळत असून, दोन्ही नेते शिंदे गटात जाणार असल्याचे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, आज सकाळपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा या चर्चांना खतपाणी मिळाले आहे. दरम्यान, खासदार आणि आमदार खरोखरच शिंदे गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांमध्येही निर्माण झाला आहे.

त्यातच उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचा उद्या धाराशिव दौरा असल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे. मात्र, या सर्व गोंधळामागील सत्य हळूहळू समोर येऊ लागले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो हा खरा नसून ‘मॉर्फ’ केलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित फोटो हा कोरोना काळातील असून, त्या वेळी शिवसेना एकसंध असताना धाराशिव शहरात एका स्थानिक नेत्याच्या पक्षप्रवेशावेळी घेतलेला आहे. मूळ फोटोत असलेल्या त्या नेत्याचा भाग काढून टाकून, केवळ एकनाथ शिंदे यांच्यासोबत ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

या प्रकारावर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा खोडसाळपणा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जाणूनबुजून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि राजकीय वातावरण ढवळून काढण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Political#Confusion#Dharashiv#Photo
SendShareTweet
Previous Post

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Next Post

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

Breaking मेळाव्याआधीच शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात,एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात काय घडणार, जिल्ह्याचे लक्ष

ताज्या घडामोडी

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group