• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, July 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्ह्याचा खरीप पीकविमा  रखडला; ५ लाख शेतकरी प्रतीक्षेत, कृषी विभाग निद्रिस्त अवस्थेत

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 6, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
661
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

खरीप पीकविमा २०२५ संदर्भात धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गोंधळाची बनत असून कृषी विभागाचे मौन शेतकऱ्यांसाठी न समजणारे ठरत आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत कधी मिळणार? किती मिळणार? याबाबत प्रचंड उत्सुकता आणि अस्वस्थता आहे. मात्र, यासंदर्भात कृषी विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे.

नवीन पीक विमा योजनेनुसार जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु एप्रिल महिना सुरू झाला तरी धाराशिव जिल्ह्याचे पीक विम्याचे कॅल्क्युलेशनदेखील पूर्ण झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन संबंधित शेतकऱ्यांना विमा रक्कम पोर्टलवर ऑनलाइन दिसू लागली आहे. मात्र धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा नेमका कुठे अडकला आहे, याबाबत कृषी विभाग स्पष्ट बोलायला तयार नाही.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. जिल्ह्यात सरासरीच्या १६२ टक्के पाऊस पडला होता, जो राज्यातील सर्वाधिक होता. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ९६ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्रासाठी विमा भरला होता. त्यापैकी ४ लाख ५ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख ६० हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकासाठी विमा उतरवला होता.

सरकारकडून हेक्टरी १७ हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम मिळणार की नाही, मिळाल्यास किती मिळणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि वास्तव यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.

यावर्षी धाराशिव जिल्ह्यासाठी पीक विमा योजना राबविण्याची जबाबदारी आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीने यापूर्वी ज्या जिल्ह्यांमध्ये काम केले आहे, तेथे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. धाराशिवमध्येही तशाच प्रकारे प्रक्रिया अडवली जात असल्याचा आरोप होत आहे.

कंपनीने सुरुवातीलाच पीक कापणी प्रयोगांवर आक्षेप घेतले. जिल्हा स्तरावर २१७ पीक कापणी प्रयोगांवर हरकती घेण्यात आल्या. मात्र, जिल्हा स्तरीय समितीने हे सर्व आक्षेप फेटाळून लावले. त्यानंतर कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे धाव घेतली. राज्यस्तरावर २१७ पैकी १७ प्रयोगांवरील आक्षेप मान्य करण्यात आले असले तरी त्यावर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया रखडल्याचे चित्र आहे.

या सर्व प्रक्रियेदरम्यान सर्वात गंभीर बाब म्हणजे कृषी विभागाची पूर्णतः शांत भूमिका. लाखो शेतकरी विम्याची वाट पाहत असताना, प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत आली आहे, पुढील टप्पे काय आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही. एकही प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, ही बाब विशेष लक्षवेधी आहे.

शेतकऱ्यांच्या मते, कृषी विभागाने पारदर्शकता ठेवत वेळोवेळी माहिती देणे आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोगातील सरासरी उत्पादन किती आले, कोणत्या पिकांचे किती प्रयोग ग्राह्य धरले गेले, विमा कंपनीने नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर आक्षेप घेतले, राज्यस्तरीय निर्णयाची स्थिती काय आहे, यासारखी माहिती उघड करणे गरजेचे आहे.

अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत न मिळाल्यास कर्जबाजारीपणा वाढण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ५ लाख शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन स्पष्ट भूमिका मांडणे, नियमित अपडेट देणे आणि प्रक्रिया गतीमान करणे आवश्यक आहे. अन्यथा मागील पाच वर्षांप्रमाणे हा पिक विमा देखील न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची भीती आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #cropinsurance#Dharashiv#district#farmers#agriculturedepartment
SendShareTweet
Previous Post

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

Next Post

आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडून बळीराजाला दिलासा; ८० लाखांच्या स्वखर्चातून करणार १६० शेतरस्ते

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडून बळीराजाला दिलासा; ८० लाखांच्या स्वखर्चातून करणार १६० शेतरस्ते

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्डसाठी गोंधळ; सेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांचे हाल

ताज्या घडामोडी

पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

July 27, 2026
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

July 27, 2026
आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास

July 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group