• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सरकारकडून मराठा समाजाच्या ‘या’ मागण्या मान्य

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 2, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
516
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेले उपोषण आज पाचव्या दिवशी मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे जाहीर केले असल्यामुळे जरांगे पाटील यांनी आज पाचव्या दिवशी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी समितीमधील सर्व सदस्यांना सोबत घेऊन जरांगे पाटील यांच्यासोबत आझाद मैदानात जाऊन सकारात्मक चर्चा केली.

हैदराबाद गॅझेट लागू करणे, सातारा गॅझेट लागू करणे आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे या तिन्ही मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. सातारा- औंध संस्थानचे गॅझेट एक महिन्यात लागू करणे, हैदराबाद संस्थानचे गॅझेट लगेच लागू करणे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे,

आंदोलकांवरील दंड मागे घेणे आणि आत्महत्या केलेल्या मराठा आंदोलकांना एक आठवड्यात आर्थिक मदत देणे यासंबंधीचा राज्यपालांची सही असलेला जीआर सहा वाजेपर्यंत शासनाकडून काढण्यात येणार आहे. जीआर हातात आल्यानंतर रात्री नऊ वाजता जरांगे पाटील मुंबई सोडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी राज्य सरकारने दहा मुद्दे असलेला जो प्रस्ताव जरांगे पाटील यांना दिला होता.

त्याचे जाहीर वाचन करून मराठा आरक्षणाच्या उपस्थित असलेल्या अभ्यासकांना जरांगे पाटील यांनी यावर काही आक्षेप आहे का? अशी विचारणा केली. यावर अभ्यासकांनी त्याला संमती दिली. त्यानंतरच जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. जीआर हातात येईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असून, त्यानंतरच विजयाचा गुलाल लावणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

तसेच शासनाने दिलेला शब्द जर पाळला नाही तर राज्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. या उपोषणामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असून, उपोषण सार्थकी लागल्याची भावना मराठा आंदोलक व्यक्त करत आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharashiv#osmanabad#Manoj jarangePatil#maratha#reservation#marathwada#trendingnews
SendShareTweet
Previous Post

ओबीसी सरपंचांचा जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा; सरकारला तोडगा काढण्याचा इशारा

Next Post

आमदार राणा पाटील आंदोलकांच्या आणि सरकारच्याही मदतीला धावले

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

आमदार राणा पाटील आंदोलकांच्या आणि सरकारच्याही मदतीला धावले

धाराशिवकरांनो, सावध रहा..! आता वाघ आपल्या शहराजवळच, वरवंटीमध्ये वाघाचे दर्शन झाल्याने चिंता वाढली

ताज्या घडामोडी

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

July 12, 2026
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

July 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group