• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राजकारण्यांनी लुटलेला तुळजाभवानी जिल्हा दूध संघ सुरू होणार,

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 8, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
374
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर घेतला निर्णय, २१ मेपासून दूध संकलन, दूध पॅकिंग, प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा विचार

चंद्रसेन देशमुख / आरंभ मराठी

धाराशिव : तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाला पुन्हा अच्छे दिन येण्याची आशा आहे. दूध संघावरील अवसायक हटविण्यात आले असून, संघाला पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण करून देण्यासाठी दूध संघाचे सभासद तसेच संचालक मंडळ सरसावले आहे.

बुधवारी दुपारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत संचालक मंडळाने दूध संघ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २१ मेपासून दूध संकलन करण्यात येणार असून, दुग्ध प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यामुळे राजकारण्यांनी बुडवलेल्या एका महत्वाच्या सहकारी संस्थेला सभासदांच्या माध्यमातून पुन्हा उभारी देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

एकेकाळी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध संघाला गेल्या काही वर्षांपासून घरघर लागली आहे.या दूध संघाचा शुभारंभ २२ ऑगस्ट १९८२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री स्व.वसंतराव पाटील आणि दुग्धविकासमंत्री स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता.

दूध संघाची सुरूवातीपासूनच भरभराट होत गेली. संघाकडे तब्बल ८०२ संस्था जोडल्या गेल्या होत्या तर सुमारे १ लाख लिटरहून अधिक दूध संकलन करण्यात येत होते. मात्र,सहकारातून स्वाहाकार करण्याच्या राजकीय मानसिकतेने अन्य सहकारी संस्थेप्रमाणेच दूध संघाचाही स्वाहा झाला. पदावर बसलेल्या अनेकांनी कमी-अधिक प्रमाणात दूध संघ ओरबाडण्याचे उद्योग केले.

परिणामी संघ डबघाईला आला.याच काळात दूध संघाची विभागणी झाली आणि दूध संकलनावर परिणाम झाला. लुटमारीच्या धोरणांमुळे तुळजाभवानी जिल्हा सहकारी दूध संघ आर्थिक अडचणीत आला.कर्मचाऱ्यांचे वेतन, संस्थांची देणी वाढत गेली.

संघ बंद पडल्यानंतर थकबाकी वूसलीसाठी संस्थांच्या प्रतिनिधींनी आंदोलन केले. संचालकांना कार्यालयातच कोंडण्याचे प्रकार झाले.मात्र, संघाला लुटलेल्या राजकारण्यांनी संघाच्या उतरणीच्या काळात हात काढून घेतले. त्यामुळे दूध संघावर अवसायक नेमण्यात आले.

देणी फेडण्यासाठी अवसायकाच्या माध्यमातून मुख्यालयाची अत्यंत मोक्यावरील जागा कवडीमोल दराने विक्री करावी लागली.त्यानंतर अवसायकांना हातपाय हलवण्यासाठी संधी मिळाली नाही.दूध संघ पुरता बुडाला. मात्र, दूध संघाचे ऐश्वर्य डोळ्यांनी पाहिलेल्या सभासदांनी आणि काही प्रामाणिक संचालकांनी दूध संघाला उभारी देण्याचे आव्हान स्विकारले आहे.

२८ एप्रिल रोजी अवसायकांना हटवून दूध संघाच्या संचालक मंडळाने दूध संघाचा ताबा घेतला आहे. आम्ही पुन्हा एकदा प्रामाणिक प्रयत्न करून दूध संघ सुरू करू, संघाला गतवैभव मिळवून देऊ, असा निर्धार करत संचालक मंडळाने बुधवारी दुपारी झालेल्या पहिल्या बैठकीत केला तसेच यावेळी चेअरमनपदी रामेश्वर वैद्य तर व्हाईस चेअरमन म्हणून अंकुश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडीनंतर संचालक मंडळाने दूध संघ पुन्हा पुनर्जिव‍ित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यात दूध संघाच्या माध्यमातून तत्काळ म्हणजेच २१ मेपासून दूध संकलन सुरू करण्यात येणार आहे. दूध संघाकडे सध्या कार्यरत केवळ २६ सभासद आहेत.सभासदांची संख्या वाढवणे, संकलन वाढवून पॅकेजिंग तसेच दूध प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव देणे, असे निर्णय घेण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे बुडालेली सहकारी संस्था पुन्हा उभारी घेण्याच्या मार्गावर आहे. मात्र,यामध्ये राजकारण घुसले तर पुन्हा पूर्वीप्रमाणेच संघाची गत होईल, प्रामाणिक प्रयत्नांना खीळ घातली जाईल, हे मात्र निश्चित.

नेमकी प्रक्रिया कशी करणार ?

प्रशासकीय पातळीवर अवसायनाच्या निर्णयावर स्थगिती आणण्यात आली असून,२८ एप्रिल रोजी अवसायक हटविण्यात आले आहेत.तर २०२३ मध्ये निवडून आलेल्या नवीन संचालक मंडळातून निवडण्यात आलेल्या पूर्वीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनला वगळून बुधवारी म्हणजेच ७ मे रोजी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अर्थात त्यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. या संचालक मंडळाने दूध संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे.वास्तविक २०२३ मध्येही दूध संघ सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, तो प्रयत्न असफल झाला होता. आता नवे संचालक मंडळ दूध संघाला बळ देण्यासाठी कामाला लागले आहे. त्यात त्यांना‍ किती प्रमाणात यश मिळते, हे येणारा काळच ठरवेल.

नळदुर्गची जागा विक्री करणार,

जिल्हा सहकारी दूध संघाकडे कळंबनजिक डिकसळ येथे दूध शीतकरण आणि प्रक्रिया उद्योगासाठी मालकीची जागा आहे. याच ठिकाणी पूर्वीप्रमाणे दूध प्रक्रिया करण्याचा प्रयत्न नवीन संचालक मंडळाचा असेल. तसेच यासाठी लागणाऱ्या ८ कोटींच्या यंत्रसामग्रीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे.खर्चाचा काही भाग म्हणून दूध संघाची नळदूर्ग येथील जागा विक्री करण्यात येणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#tuljapur#milk
SendShareTweet
Previous Post

दारू प्यायली म्हणून दहिवडी येथे बापानेच केला मुलाचा खून

Next Post

गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला ढोकी येथून पकडले

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला ढोकी येथून पकडले

जिल्ह्यातील विकास कामांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत घेतली बैठक

ताज्या घडामोडी

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

June 20, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group