• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, September 18, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांपेक्षा धाराशिव जिल्ह्यांचा अधिक विकास करू; पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांची भूमिका

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 21, 2024
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
310
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

भूम व तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

प्रतिनिधी / भूम

धाराशिव जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरू असून, शेतीसाठी पाणी हा मुलभूत विषय सरकारने तातडीने मार्गी लावण्यासाठी पावले उचलली आहेत. धाराशिव जिल्ह्याचा विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांपेक्षा अधिक व्हावा, या उद्दिष्टाने आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिली.


पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते रविवारी भूम शहर व तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच विविध समाजातील नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,दत्ता साळुंखे,प्रशांत चेडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हांडोंगरीकर,सुभाष सिद्धीवाल, जाकीर सौदागर,निश्चित चेडे,नागनाथ नाईकवाडे, शाकीर शेख,संजय शिंदे व विशाल ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले की,धाराशिव जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी कृष्णा भीमा खोऱ्याचे पाणी उजनी धरणात आणून ते पाणी लिफ्ट करून कोडगाव धरणात आणण्यासाठी राज्य शासनाकडून ११ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे.७० टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. हे पाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत कवडगाव धरणात येईल. फेब्रुवारी महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचीही शक्यता आहे. कष्टाळू शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यास या भागाचाही पश्चिम महाराष्ट्रासारखा विकास होईल.या जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील भूम,परांडा व वाशी आणि कळंब तालुक्यात विविध विकास कामे आणि रुग्णालयांचे भूमिपूजन झाले आहे.जिल्ह्यात आरोग्य क्रांती आणण्याचे हे प्रथम उदाहरण आहे. यापुढे जिल्ह्यात हरितक्रांती, धवल क्रांती आणि जलक्रांती घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच भूमिपूजन झालेली व सुरू असलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.जनतेला विकासाचे फळ मिळाले पाहिजे.या हेतूने सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची व टिकाऊ होतील याची काळजी येथील नागरिकांनी घेणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी आरोग्य केंद्रात डायलेसिस मशीन आणि सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य मंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यावर पालकमंत्री डॉ.सावंत यांनी एक महिन्याच्या आत डायलेसिस मशीन आणि मार्च अखेरपर्यंत सिटीस्कॅन मशीन कार्यान्वित होईल असे आश्वासन दिले.तसेच भूम नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ४६ कोटी ८४ लक्ष रुपयांचा निधीही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न लवकर सोडविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबतही डॉ.सावंत यांनी मुख्याधिकारी यांना निर्देशित केले.


जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे म्हणत सोनारी व तेरणा हे दोन कारखाने पुन्हा सुरू करून येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आधार मिळाल्याचे ते म्हणाले.

तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूम – वारे,वडगाव – कासारी व भोगलगाव- साकत या रस्त्याच्या १४ कोटींच्या कामांचे,गोलाई चौक ते एमआयडीसी सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण रस्त्याच्या १३ कोटी ८० लाख रुपयांचे,भूम ते इंदिरानगर पूल काँक्रीट रस्त्यासाठी ५ कोटी कामाचे, इंदिरानगर पूल ३ कोटी ८० लाख, इंदिरानगर पूल ते एमआयडीसी काँक्रीट डांबरीकरण रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांच्या कामाचे आणि भूम शहरातील ११४ कोटी ६५ लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचारी, आशा सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिक

Next Post

शिराढोणच्या राम नगरीत दोन दिवसांचा उत्सव, श्रीराम मंदिरात होणार श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा

Related Posts

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
Next Post

शिराढोणच्या राम नगरीत दोन दिवसांचा उत्सव, श्रीराम मंदिरात होणार श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा

80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीनुसारच शिवसेनेची वाटचाल; जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांचे मत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवच्या पर्यटनाला मिळणार नवी झळाळी, २९ राज्य संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासह पाच पर्यटनस्थळांवर विकासकामांना मिळाली गती

धाराशिवच्या पर्यटनाला मिळणार नवी झळाळी, २९ राज्य संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासह पाच पर्यटनस्थळांवर विकासकामांना मिळाली गती

September 18, 2026
मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा  पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

September 16, 2026
‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

September 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group