प्रतिनिधी / शिराढोण
छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या 388 व्या जयंतीनिमित्त शिराढोण येथे व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिराढोणचे उपसरपंच अमोल माकोडे, ग्रामपंचायत सदस्य आकाश धाकतोडे, सुरेश महाजन, नितीन (आबा) पाटील,किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश महाजन,श्रीकांत धाकतोडे, अजय सुरवसे,लक्ष्मण धाकतोडे,अभिजीत धाकतोडे,शंकर धाकतोडे, बालाजी धाकतोडे,वैभव धाकतोडे, उत्रेश्वर गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतापगडावर अफजल खानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून इतिहासामध्ये “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” या म्हणीने अजरामर झालेले शूरवीर जिवाजी महाले यांची 388 वी जयंती करण्यात आली. ही जयंती “व्यापारी मित्र मंडळ शिराढोण” यांच्या वतीने साजरी करण्यात आली.