• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, October 2, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

हैद्राबाद-पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे; दुरुस्तीअभावी अपघात, प्रशासन अजून किती मृत्यूची वाट पाहणार ?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 10, 2023
in महाराष्ट्र
0
हैद्राबाद-पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे;  दुरुस्तीअभावी अपघात,  प्रशासन अजून किती मृत्यूची वाट पाहणार ?
0
SHARES
62
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

जहीर इनामदार /नळदुर्ग

शहरामधून जाणाऱ्या पुणे -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालक व प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडलेले असताना त्याची दुरुस्ती करण्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग विभाग टोल जमा करण्यातच दंग आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदाराला महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे, खड्डे चुकविताना दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत, शिवाय तासनतास वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे.

नळदुर्ग शहराजवळील पुणे-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. नळदुर्गहून उमरगाकडे जाताना जुना जकात नाका ते आलियाबाद पूल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत,महामार्गाच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे हा महामार्ग सध्या वाहन चालक व प्रवासासाठी जीवघेणा ठरत आहे. हे खड्डे चुकविण्याच्या नादात या ठिकाणी दररोज अनेक अपघात होत आहेत.अपघात झाल्यानंतर या महामार्गावर नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होत आहे. अनेकदा हे खड्डे बुजविण्याचे थातूरमातूर काम करण्यात आल्याने पुन्हा त्याच जागी खड्डे पडत आहेत,खड्डे बुजविण्याची आणि पुन्हा पुन्हा खड्डे पडण्याची मालिका वारंवार सुरु आहे. त्यामुळे खड्ड्याची व्यवस्थित दुरुस्ती व्हावी व पुन्हा त्या ठिकाणी खड्डा पडू नये,असे काम होणे अपेक्षित आहे. हा महामार्ग जीवघेणा ठरत असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. २ मे रोजी या खड्ड्यामुळे या ठिकाणी दोन तीन अपघात झाले आहेत. गुरुवारी (दि.८) रात्री झालेल्या एका अपघातामध्ये तर एका शिक्षकाचा पाय निकामी झाला आहे, अशी गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असताना राष्ट्रीय महामार्ग विभाग मात्र टोल वसुली करण्यात दंग आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचे कामही गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. मध्यंतरी या कामाला गती आली होती मात्र सध्या हे काम पुन्हा एकदा मंदावले आहे. जोपर्यंत बायपास रोड चालू होत नाही,तोपर्यंत नळदुर्ग शहराजवळील महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी होतच राहणार आहे.त्यामुळे संबंधित ठेकेदाराने इतर काम बाजूला ठेवून प्रथम बायपासचे काम पूर्ण करून बायपास रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करावा. नळदुर्ग शहराजवळील महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे तत्काळ व कायमस्वरूपी बुजविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला द्यावेत,अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांनी केली आहे. खड्डे चुकविण्याच्या कारणावरून किंवा वाहनांना बाजू देण्याच्या कारणावरून दररोज या ठिकाणी दुचाकी चालक व मोठ्या वाहन चालकांमध्ये खटके उडत आहेत, पावसाळ्यापूर्वी या मार्गाची पूर्णतः डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.

SendShareTweet
Previous Post

खासदार ओमराजेंच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाने दिली कबुली, म्हणाला..

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनी ध्वजारोहण

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनी ध्वजारोहण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनी ध्वजारोहण

खासदार ओमराजेंच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाने दिली कबुली, म्हणाला…

खासदार ओमराजेंच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाने दिली कबुली, म्हणाला...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

October 1, 2026
विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 1, 2026
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण;  गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

October 1, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group