बिना ट्युशन, केवळ स्वतःच, स्वयंप्रेरणेने अभ्यास करत नीट परीक्षेत, पहिल्याच प्रयत्नात राजुरीच्या दोन विद्यार्थ्यांनी मिळवले कौतुकास्पद गुण. (NEET marks 649 आणि 621).त्यामुळे या विद्यार्थ्यांचा
वैद्यकीय शिक्षणाचा प्रवेश (MBBS) निश्चित झाला आहे.
कोणताही कोचिंग क्लास न लावता, दैनंदिन कॉलेज ही नियमितपणे न करता, केवळ स्वतःच सेल्फ स्टडीची जोड देत, लातूरमध्ये भाडोत्री रूम वर राहून, अहोरात्र अभ्यास करत, पहिल्याच वर्षीच्या प्रयत्नात, राजुरी गावचे सुपुत्र श्रेयश महादेव इंगळे याने 649 आणि प्रतीक सुरेश इंगळे याने 621 मार्क्स NEET मध्ये मिळवले आहेत. राजुरीसारख्या ग्रामीण भागातून येवून, शेतकरी कुटुंबातील वातावरणात, बिना ट्युशन, केवळ स्वतःच, स्वयंप्रेरणेने अभ्यास करत नीट परीक्षेत, पहिल्याच प्रयत्नात असे कौतुकास्पद यश मिळवले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी 11 वी 12 वी साठी लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजुरीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले असून शालेय शिक्षण उस्मानाबादच्या रविशंकर विद्यालय आणि छत्रपती शिवाजी हायस्कुलमध्ये झाले आहे.
गावकऱ्यांनी केले कौतुक
श्रेयस आणि प्रतीक सोबतच त्यांच्या आई वडील, पालकांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे. दोघांनी मिळवलेल्या या यशाबद्दल खूप मोठा अभिमान गावकऱ्यांना आहे. श्रेयस आणि प्रतीकने नीटसारख्या कठीण परीक्षेत स्वयंप्रेरणेने मिळवलेले यश, हे गावच्या पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारं यश ठरेल,असा विश्वास व्यक्त होत आहे.