आरंभ मराठी / धाराशिव
गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मिळालेल्या जोरदार यशानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही महायुतीची एकतर्फी सत्ता येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात होता. मात्र प्रत्यक्ष निकालांनी हा अंदाज फोल ठरवत महाविकास आघाडीने भाजपचा वारू रोखण्यात यश मिळवले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी निर्णायक कामगिरी करत भाजपच्या एकहाती सत्तेचे स्वप्न भंग केले.
काही ठिकाणी भाजप आघाडीवर असली, तरी अनेक महत्त्वाच्या गटांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत सत्ता संतुलन आपल्या बाजूने वळवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचा एकतर्फी विजय रोखला गेला असून, निवडणूक निकालांनी संमिश्र आणि काट्याची राजकीय परिस्थिती समोर आणली आहे.
या निकालांमुळे आगामी जिल्हा परिषद सत्ताकारण अधिक गुंतागुंतीचे होण्याची चिन्हे आहेत.









