आरंभ मराठी टीम / धाराशिव
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, धाराशिव मतदारसंघातून आमदार कैलास पाटील यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना पोस्टल मतांमध्येही आघाडी मिळाली आहे.
तसेच तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणा जगजितसिंह पाटील पहिल्या तसेच दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहेत. त्यांना पहिल्या फेरीत 5 हजारांची तर तिसऱ्या फेरीत 4100 मतांची लीड मिळाली आहे.
उमरगा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार प्रवीण स्वामी आघाडीवर आहेत. त्यांनी पहिल्या तसेच दुसऱ्या फेरीत आघाडी घेतली आहे.
परंडा मतदारसंघातून राहुल मोटे यांनी दुसऱ्या फेरी अखेर 499 मतांची आघाडी घेतली आहे. काही मतदारसंघात दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.