संत शिरोमणी गोरोबा काकांची पावन भूमी तेर येथील तेरणा नदीचा हा सूर्य मावळतीला जाताना विलोभनीय दिसणारा किनारा. रविवारच्या प्रसन्न सायंकाळी तेरच्या पंकज कदम यांनी टिपलेला हा मनोहारी नजारा.कदम हे डाक कार्यालयात नोकरी करतात.त्यांच्या या फोटोला धाराशिवचे शिक्षक आणि शीघ्र कवी आनंद वीर यांनी समर्पक ओळी दिल्या आहेत..
गोरोबांची पावन भूमी
तगर म्हणे तीज कोणी,
चैतन्याचा तेज सोहळा
माय तेरणा चरणी।।